शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

अवजड वाहनांमुळे रस्त्यांची दुरवस्था

By admin | Updated: August 12, 2014 02:04 IST

अवजड वाहनांमुळे रस्त्यांची दुरवस्था

 

कळवण : कळवण - अभोणा -कनाशी- हतगड या राज्यमार्ग १७ रस्त्यावर जिरवाडा शिवारात सुरू असलेल्या पुलाच्या भराव कामावर मुरूम वाहणाऱ्या अवजड वाहनांमुळे जिरवाडा ते शिवभांडणे रस्त्याची दुरवस्था झाली असून, हा रस्ता पूर्णपणे खचला आहे. आदिवासी बांधवांसाठी जीवघेणा ठरला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराकडून तत्काळ रस्ता दुरुस्त करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कळवण तालुक्यातील कनाशी-हातगड रस्त्यावर तीन ठिकाणी पुलांचे काम सुरू आहे. या पुलांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी करून घेणे गरजेचे होते. परंतु ठेकेदाराच्या आडमुठे धोरणापुढे सार्वजनिक बांधकाम विभाग हतबल झाल्यामुळे काम पूर्ण न केल्याने आज महाराष्ट्र व गुजरात या राज्यांचा तसेच कळवण व सुरगाणा या तालुक्याच्या आणि जवळपास १५ ते २० गावांचा संपर्क तुटला आहे. आजही या भागात पावसाचा जोर कायम असून, या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. जिरवाडे शिवारातील पुलावर मुरूम मातीचा भराव करण्याचे काम सुरू आहे. हा भराव जिरवाडे शिवारातील शिवभांडणे रस्त्यावरून खासगी मालकाकडून आणला जात आहे. मात्र मुरुम आणण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करण्याऐवजी ट्रकचा वापर केल्याने जिरवाडे -शिवभांडणे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्ता पूर्णपणे खचला असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहे. हा रस्ता एक वर्षापूर्वी आदिवासी विकास विभागाच्या ठक्कर बाप्पा निधीतून तयार करण्यात आला होता. जिरवाडे शिवारातील पुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक शिवभांडणे रस्त्याने सुरू होती, मात्र अवजड वाहनांनी रस्ता खराब केल्याने पर्यायी रस्ताही बंद झाला आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल बाजार समितीपर्यंत आणता येत नाही . आदिवासी विद्यार्थ्यांना वाहने बंद झाल्याने पायपीट करण्याची वेळ आली आहे. रस्त्यांची दुरुस्ती संबंधित ठेकेदाराकडून करून घ्यावी अन्यथा कळवण आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला पंचक्रोशीतील आदिवासी बांधवांसह टाळे ठोकू, असा इशारा कळवण पंचायत समितीचे सभापती मधुकर जाधव यांनी दिला आहे. (वार्ताहर)