शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

भाजीबाजारामुळे रस्ता बंद

By admin | Updated: January 23, 2017 22:50 IST

हिरावाडी, कमलनगर : महापालिकेचे दुर्लक्ष; अपघातांत वाढ

पंचवटी : हिरावाडीतील कमलनगर येथे दर सोमवारच्या दिवशी भर वाहतुकीच्या रस्त्यावर भरणाऱ्या भाजीबाजारामुळे वाहतुकीचा रस्ता पूर्णपणे बंद होत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. याशिवाय भाजीविक्रेत्यांचे जाळे वाढतच चालल्याने ते थेट मुख्य रस्त्यापाठोपाठ महामार्ग रस्त्याच्या कडेला ठाण मांडून बसत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून भरणाऱ्या या भाजीबाजाराकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने रस्त्यावर भरणारा हा भाजीबाजार हटविणार कोण, असा सवाल परिसरातील संतप्त नागरिकांनी केला आहे.  सोमवारी रस्त्यावर भरणाऱ्या आठवडे बाजारातील भाजीविक्रेते बाजार आटोपल्यानंतर भाजीपाला थेट रस्त्यावर फेकतात त्यामुळे परिसरात कचरा साचतो, शिवाय मोकाट जनावरांचाही उपद्रव वाढत आहे. रस्त्यावर भरणाऱ्या या भाजीबाजारामुळे नागरिकांना वाहने नेणे सोडाच तर पायी चालणेदेखील अवघड होत आहे.  गेल्या अनेक महिन्यांपासून येथे भरणाऱ्या या भाजीबाजारामुळे सोमवारच्या दिवशी कमलनगरकडून क्रीडा संकुलकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहात असल्याने त्याचा फटका परिसरातील शेकडो वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.  रस्त्यावर भरणाऱ्या या भाजीबाजारामुळे अपघाताची दाट शक्यता असून याबाबत महापालिकेने तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)