शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

अखेर रस्ते ‘बजेट’ मध्ये!

By admin | Updated: December 29, 2015 23:06 IST

महापौरांचा हिरवा कंदील : आर्थिक तरतूद मात्र गुलदस्त्यात

नाशिक : रखडलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी दोनशे कोटी रुपयांच्या प्रस्तावाला अखेरीस मंगळवारी महापौरांनी हिरवा कंदील दिला. अंदाजपत्रकाच्या ठरावावर स्वाक्षरी केल्याने नगरसेवकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. रस्त्यांच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव अंदाजपत्रकात समाविष्ट केला असला तरी त्यासाठी निधी कोठून आणणार हे गुलदस्त्यात असून महापौरांनी मात्र बुधवारी त्याची उकल करू असे स्पष्ट केले आहे.महापालिकेचे अंदाजपत्रक सध्या गडगडले आहे. त्यातच नवनवीन सूचना त्यात समाविष्ट केल्या जात असल्याने ही कामे कशी होणार असा प्रश्न आहे. आयुक्तांनी स्थायी समितीला १ हजार ४३७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. त्याला आकार देताना स्थायी समिती सदस्यांनी अनेक कामे आणि योजना सुचवून बजेट फुगवले. सुमारे तीनशे ते सव्वा तीनशे कोटी रुपयांच्या वाढीमुळे अंदाजपत्रक १ हजार ७६९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. महासभेवर हे अंदाजपत्रक आले तेव्हा अखेरचे वर्ष म्हणजे इलेक्शन इयर असल्याने नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील कामे उपसूचनेद्वारे घुसवून त्याचा पाऊस पाडला. दरम्यानच्या काळात सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या रस्ते दुरुस्तीचा सर्वांना खुश करणारा प्रस्ताव प्रशासनाने मांडला. रस्त्यांचे डांबरीकरण हा सर्व नगरसेवकांच्या जिव्हाळ्याचा विषय असला तरी त्यासाठी निधीची ओढाताण होत होती. महासभेच्या ठरावात या रस्त्यांच्या तरतुदीचा समावेश असेल किंवा नाही याविषयी नगरसेवकांची उत्सुकता शिगेला ताणली गेली होती.