शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

रस्त्यावरील अडवणूक : नियम पालनापेक्षा वसुलीवर अधिक भर टार्गेट वसुलीसाठी सामान्य नागरिक ‘टार्गेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 01:10 IST

वाहतूक शाखेला कारवाईचे दिलेले उद्दिष्ट आणि त्याच्या पूर्ततेसाठी सुरू असलेल्या सापळ्यात सर्वसामान्य नागरिक सहज सापडतात. सहजगत्या म्हणून कोठे निघाले आणि या फेºयात अडकले की सुटका होत नाही.

ठळक मुद्दे सर्वसामान्य नागरिकच अडचणीत हवालदारानेच तक्रार केल्याचा विषय गाजला कायद्यापलीकडील वसुलीचे समर्थन

नाशिक : वाहतूक शाखेला कारवाईचे दिलेले उद्दिष्ट आणि त्याच्या पूर्ततेसाठी सुरू असलेल्या सापळ्यात सर्वसामान्य नागरिक सहज सापडतात. सहजगत्या म्हणून कोठे निघाले आणि या फेºयात अडकले की सुटका होत नाही. साहजिक नियम पालनापेक्षा अधिक भर वसुलीवर असल्याने पोलिसांचे कर्तव्यपालन नागरिकांना मात्र जाच ठरत आहे.शहरात वाढलेली वाहनांची संख्या आणि त्यातच अपुºया भौतिक सुविधा यामुळे समस्या जटिल होत चालली आहे. त्यातच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया प्रवृत्ती असतात परंतु त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकच अडचणीत आणले जातात. मुळात वाहतूक पोलिसांना नियुक्त करताना कोणते निकष लावले जातात हे जणू उघड गुपित आहे. मुंबईच्या एका हवालदारानेच याबाबत तक्रार केल्याचा विषय राज्यभरात गाजला होता. परंतु अशा टार्गेटपूर्तीसाठी सर्वसामान्य वेठीस धरले जातात. अनेक ठिकाणी तर भल्या सकाळी दिवसभराचे टार्गेट वसूल करण्यासाठी प्रयत्न केले जातात. एकदा केसेसची शासकीय उद्दिष्टपूर्ती झाली की पुढे काय होते हे वेगळे विचारण्याची गरज नाही. पोलिसांच्या या वसुलीची महाराष्टÑाबाहेरही चर्चा पसरली आहे. त्र्यंबकरोडला जाताना येणाºया अडचणी हे अनेक देशांतील वाहतूक व्यावसायिकांना मनस्ताप देणारे ठरले आहे. एकदा तर अकारण वसुलीचा प्रयत्न झाल्यानंतर परराज्यातील भाविकांनी रस्त्यावरच ठाण मांडून पोलीस यंत्रणेची लक्तरे वेशीवर मांडली होती.अलीकडे तर मोहिमा अगोदरच सोशल मीडियावरून व्हायरल होतात आणि त्यानंतर पोलिसांच्या जाचापासून सुटका करण्यासाठी नागरिकांना मार्ग बदल करावे लागतात. सुरक्षिततेची काळजी प्रत्येकाला असते आणि त्यात कसूर झाला तर जिवावर बेतते. कित्येकदा गुन्हेगारीशी याचा संबंध असतो. हे सर्व मान्य केले तरी कायद्यापलीकडील वसुलीचे समर्थन पोलीस दलातील शीर्ष अधिकारी तरी कसे करणार?तेव्हा कुठे असतात वाहतूक पोलीस?शहरात अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. कोणताही सिग्नल असो तो तोडणारे वाहनचालक असतात. त्यातून अपघात होतात. परंतु बिटको सिग्नल, त्रिमूर्ती चौक, नागजी चौफुली, काठे गल्ली सिग्नल, मेहेर सिग्नल अशा अनेक ठिकाणी असे प्रकार घडत असताना नेमके पोलीस नसतात; परंतु एखाद्या मार्गावर मात्र दबा धरून बसलेले पोलीस सहज अवतीर्ण होतात, हादेखील नागरिकांच्या दृष्टीने आश्चर्याचा भाग ठरला आहे.