शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील रस्त्यांची चाळण

By admin | Updated: August 9, 2015 22:38 IST

रिमझिम पावसातच दैना : खड्डे बुजविण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष

नाशिक : शहरात अद्याप मुसळधार पावसाने हजेरी लावली नसली तरी, मागील काही दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी हजेरी लावत आहे. हलक्या पावसाच्या सरींमुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडून चाळण होण्यास सुरुवात झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हलक्या सरींनी जर रस्त्यांची दैना होत असेल तर मुसळधार पावसामध्ये ‘रस्त्यांत खड्डे की खड्ड्यांत रस्ते’ असेच काहीसे चित्र बघावयास मिळेल, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहे.सध्यातरी शहरात जोरदार पाऊस होत नसला तरी बहुतांश रस्त्यांवर लहान-मोठ्या खड्डे पडलेले पहावयास मिळत आहे. यामुळे नाशिककरांची वाहने खिळखिळी होण्याबरोबरच पाठीच्या दुखण्याचादेखील त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. मुंबई नाक्याकडून वडाळारोडकडे जाणारा रस्ता, नासर्डी नदी पुलापासून खोडेनगरकडे जाणारा पखालरोड, वडाळागावाकडे जाणारा रस्ता, वडाळा नाका, द्वारका चौफुली, इंदिरानगर-डीजीपीनगर कॅनॉल रस्ता, शरणपूररोड सिग्नल आदि रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.रस्त्यांवर पडलेले खड्डे, शहरातील विविध रस्ते दुभाजकांलगत साचलेला मातीचा ढीग व त्यामुळे रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे होणारा चिखलात वाहने घसरून होणाऱ्या अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. संततधार पाऊस सुरू नसला तरीदेखील पालिकेच्या बांधकाम विभागामार्फत अद्याप रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात येत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वातानुकूलित चारचाकीमधून शहरात वावरणाऱ्या पालिके चे अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधीं विरुद्धही नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.(प्रतिनिधी)