अझहर शेख नाशिकनाशिक जिल्हा हा कृषी क्षेत्रात अधिक प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जातो. याबरोबरच डोेंगररांगा, धरणे, वृक्षसंपदा आणि शेतीचा ग्रामीण बाज असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी वर्षभरात कृषी पर्यटनाच्या वाटेवर स्वार झाले आहे. कृषी पर्यटनाला नैसर्गिकदृष्ट्या असलेला वाव आणि नागरिकांना पर्यटनाची पडणारी भुरळ लक्षात घेत कृषी पर्यटन विकसित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून शेतकऱ्यांना विविध योजनांतर्गत प्रोत्साहन दिले जात आहे. द्राक्षे, कांदा, मका, ऊस या प्रमुख पिकांचे उत्पादनासाठी नाशिक प्रसिद्ध आहे. द्राक्षमळ्यांमुळे वायनरी उद्योग व्यावसायिकांनाही नाशिकने आकर्षित केले आहे. यामुळे वाइन पर्यटनालाही चालना मिळत आहे. याबरोबरच जिल्ह्यात कृषी पर्यटनही विकसित होताना दिसत आहे. कृषी पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळही प्रयत्नशील असून, जे शेतकरी पर्यटनाची आवड ठेवतात त्यांना मार्गदर्शन करून ‘महाभ्रमण’, निवास - न्याहारी’ योजनांद्वारे कृषी पर्यटनासाठी प्रोत्साहित करत आहे. यासाठी मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडे असलेली प्रकल्पासाठी जागा, ठिकाण, भांडवल आणि संकल्पना आदि विषयींची माहिती घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शेतकरी कृषी पर्यटनाच्या वाटेवर‘
By admin | Updated: December 26, 2016 02:25 IST