शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरहेड वाहिन्यांचा धोका कायम

By admin | Updated: June 27, 2017 00:34 IST

नाशिक : नागपूरमध्ये ओव्हरहेड उच्चदाब वाहिनीच्या धक्क्यामुळे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन बालकांना जीव गमवावा लागला, तर या घटनांना महावितरणला जबाबदार धरत अभियंत्यांवर कारवाईदेखील करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नागपूरमध्ये ओव्हरहेड उच्चदाब वाहिनीच्या धक्क्यामुळे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन बालकांना जीव गमवावा लागला, तर या घटनांना महावितरणला जबाबदार धरत अभियंत्यांवर कारवाईदेखील करण्यात आली. या घटनेमुळे ओव्हरहेड वाहिन्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे. नाशिकमध्येही अशाप्रकारचा धोका असून, सिडकोसह शहरातील झोपडपट्टी आणि गावठाण भागात ओव्हरहेड वाहिन्या अजूनही मृत्यूच्या सापळा बनून आहेत. परिमंडळात ओव्हरहेड वाहिन्यांमुळे केवळ तीन महिन्यांत तब्बल आठ जणांना जीव गमवावा लागला आहे. शहरातील ओव्हरहेड वाहिन्या भूमिगत कराव्यात यासाठी महावितरणला पायाभूत विकास आराखड्यातून कोट्यवधींचा निधी प्राप्त झालेला आहे. केवळ याच माध्यमातून नव्हे तर अन्य दोन योजनांमधून महावितरणने भूमिगत वाहिन्यांचे काम सुरू केले आहे. परंतु सदर कामांचे कंत्राट खासगी व्यक्तींना देण्यात आल्यामुळे या कामांना अपेक्षित गती प्राप्त झाली नसल्याचे दिसून येते. गेल्या पाच वर्षांत अपेक्षित कामे झाली नसल्याचे प्रत्यक्ष दिसत असताना कागदोपत्री मात्र कामे प्रगतीवर दाखविली जात आहेत. पायाभूत विकास सुधारणा आराखडा अंतर्गत ५३५ कोटी खर्चाच्या योजनेतून २१९ किलोमीटरची वाहिनी भूमिगत करण्यात आली असून, याच योजनेतील दुसऱ्या टप्प्यात ३२५.६ किलोमीटरपैकी ३१६ किलोमीटर वाहिन्या भूमिगत करण्याचे काम पूर्ण झाल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. गतिमान विद्युत विकास सुधारणा कार्यक्रमांतर्गत ३० किलोमीटर केबल भूमिगत करण्यापैकी केवळ अर्धा किलोमीटरचे काम बाकी असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. दुसऱ्या टप्प्यातील ५०.५ किलोमीटरपैकी फक्त २४ किलोमीटर भूमिगत केबलचे काम पूर्ण झाले आहे.  याशिवाय पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना तसेच एकात्मिक ऊर्जा विकास प्रकल्प (आयपीडीएस) या दोन योजनांमधूनही केबल भूमिगत करण्याचे काम प्रस्तावित आहे. यातील काही कामाचे कार्यारंभ आदेशही निघाले आहेत. याचाच अर्थ अजूनही वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाला अपेक्षित गती प्राप्त झालेली नाही.