नाशिक : शहरात डेंग्यूच्या आजाराने अजूनही नाशिककरांची पाठ सोडली नसून गेल्या बारा दिवसांत ७६ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, शहरात महापालिकेने पेस्ट कंट्रोलची फवारणी सुरू केली असली तरी डेंग्यूचा धोका कायम असल्याचे दिसून येत आहे.गेल्या सात-आठ महिन्यांपासून शहरात डेंग्यूच्या आजाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार केले आहे. दि. १ ते १२ आॅगस्ट या कालावधीत १५१ संशयित रुग्णांचे रक्तनमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १२२ नमुने प्राप्त झाले असून, त्यात ७६ रुग्णांना डेंग्यूच्या आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये ६३ रुग्ण हे महापालिका हद्दीतील, तर १३ शहराबाहेरील असल्याचे मनपाच्या वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले. शहरात जानेवारी ते १२ आॅगस्ट या कालावधीत ३४१ रुग्णांना डेंग्यूची लागण झालेली आहे. (प्रतिनिधी)
शहरात डेंग्यूचा धोका कायम
By admin | Updated: August 12, 2016 23:02 IST