शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइंला चुन्याची डबी, ध्येयनाम्यात आठवलेंची छबी‘

By admin | Updated: February 12, 2017 00:26 IST

रामदासी’ भाजपा : मतांसाठी बेगमी

 नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीत अवघ्या सतरा जागाही रिपाइंला न देता चुना लावणाऱ्या भाजपाने दलित मतांची बेगमी करण्यासाठी आपल्या ध्येयनाम्यात रामदास आठवले यांची छबी वापरली आहे. विशेष म्हणजे खुद्द आठवले यांनीच मुंबई महापालिका वगळता आपली छबी वापरू नये, असे आवाहन भाजपाला केले असताना नाशिकमध्ये मात्र दलित मतांसाठी रामदासी झालेल्या पक्षाने त्यांचे आवाहन धुडकावले आहे. देशात आणि राज्यात भाजपा सरकारमध्ये रिपाइं आठवले गट सहभागी आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपाबरोबरच रामदास आठवले राहणार असे गृहीत धरले जात होते. त्यादृष्टीने तयारी सुरू होती. परंतु मुंबई महापालिका वगळता अन्यत्र भाजपा आणि रिपाइंचे सूत जमले नाही. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत १२२ अनुसूचित जातीच्या अठरा जागा, तर अनुसूचित जातीच्या नऊ जागा राखीव आहे. त्यातील १६ जागा रिपाइंचे स्थानिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी मागितल्या होत्या. रिपाइंने हा प्रस्ताव पाठविला तेव्हा भाजपात इच्छुकांच्या मुलाखती सुरू होत्या. त्यामुळे मुलाखती संपल्यानंतर चर्चा करू, असे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नंतर टाळाटाळ करीत दोन ते तीन जागा देण्याची तयारी दर्शविली. विशेष म्हणजे सातपूर विभागात रिपाइंचे जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्यासाठी जागा सोडण्यासही नकार देण्यात आला. त्यामुळे रिपाइं आठवले गटाने भाजपाचा नाद सोडला. भाजपाने ‘चुना लावला नाही तर चुन्याची आख्खी डबीच रिपाइंच्या हातावर रिती केली’, अशी भावना या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. आठवलेंचा दम; तरीही म्हणे ‘हमदम’

विशेष म्हणजे मुंबई महापालिकेच्या व्यतिरिक्त राज्यातील अन्य नऊ महापालिकांत भाजपा-रिपाइं युती नसल्याने आपले छायाचित्र वापरू नये, असे रामदास आठवले यांनी शुक्रवारीच स्पष्ट केले असून, त्यांनी एकप्रकारे भाजपाला दमच भरला आहे. असे असताना भाजपाने रामदासांची आळवणी सुरू केली आहे.

नाशिक रिपाइंची भूमिका अद्यापही अस्पष्ट त्यामुळे नाशिकमध्ये भाजपा आणि रिपाइं युती नसताना आता मात्र दलित मतांसाठी भाजपाला रामदास ‘आठवले’ आहेत. भाजपाने नाशिक महापालिकेसाठी शुक्रवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या ध्येयनाम्यात रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांची छबी वापरली आहे. त्यामुळे भाजपा काही प्रभागांमध्ये ‘राम-दास’ झाल्याचे जाणवत आहे.