नाशिक : येवला शहरातील महात्मा फुले नगर परिसरातील विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिपाइं (आठवले गट) यांच्या वतीने नगरपालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.महात्मा फुले नगर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरातील शाळे जवळील शौचालय बंद करावे, गटारीचे व घरकुलाचे अपूर्ण कामे पूर्ण करावीत, शाळेच्या मागील बाजूचे रस्ते व वीजखांब बसविण्यात यावे आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढला होता. मोर्चात युवक तालुकाध्यक्ष बाळासाहेब कसबे, अजय पवार, धोंडीराम पडवळ, लहानू त्रिभुवन, सुनील नागपुरे, बाळासाहेब इंगळे, दीपक पवार, अमोल पडवळ, सुदर्शन शिंदे, भगवान गायकवाड, संजय गायकवाड, प्रकाश नागपुरे, समाधान पडवळ, अनिल पवार, प्रशांत पडवळ, आनंद पडवळ, विष्णू पडवळ, जगताप, दीपक लोखंडे, संदीप पवार, विकी कसबे, अर्जुन पडवळ, बेबी इंगळे, संगीता गुंजाळ, सिंधूबाई मोरे, राणी मांजरे, बिना गायकवाड, शीला मांजरे आदी सहभागी झाले होते.
येवला पालिकेवर रिपाइंचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 01:00 IST