शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावला प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर रिपाइंचे बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 22:56 IST

नांदगाव, : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे यंत्रणेच्या मर्यादा उघड्या पडल्या. यंत्रणेच्या अकार्यक्षमतेच्या निषेधार्थ रिपाइंच्या वतीने ३० सप्टेंबरला तहसील कार्यालयापुढे आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.

ठळक मुद्देनिवेदन : आमरण उपोषणाचा इशारा

नांदगाव, : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे यंत्रणेच्या मर्यादा उघड्या पडल्या. यंत्रणेच्या अकार्यक्षमतेच्या निषेधार्थ रिपाइंच्या वतीने ३० सप्टेंबरला तहसील कार्यालयापुढे आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.

रिपाइंचे शहराध्यक्ष महावीर (नाना) जाधव, विलास कोतकर, गौतम काकळीज यांनी याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. निवेदनाची दखल घेत कारवाई करण्याचे आश्वासन धांडे यांनी दिले. निवेदनात म्हटले आहे की, दळणवळण सुलभ व्हावे व जनतेचा शहराशी जनसंपर्क राहावा, या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या सब-वेमधील तांत्रीक अडचणी व अतिक्रमणे याबाबत महसूल, पोलीस आणि पालिका प्रशासन या सर्वच प्रशासकीय स्तरावर उदासीनतेची भूमिका असल्याने नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे यंत्रणेच्या मर्यादा उघड्या पडल्या आहेत.

सर्वसामान्य जनतेला वेठीला धरले जात असून, जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडावे लागतात. गंभीर रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी चार किमीचा वळसा घालून जावे लागत आहे. या विषयावर महसूल पालिका आणि पोलीस यांच्या पातळीवर धोरणात्मक उपाययोजनांना चालना मिळत नाही, असे दिसून येते त्याच्या निषेधार्थ रिपाइंच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.फोटो- २७ नांदगाव निवेदननांदगावचे मुख्याधिकारी विवेक धांडे याना मागण्यांचे निवेदन देताना रिपाइंचे शहराध्यक्ष महावीर जाधव.

टॅग्स :PoliticsराजकारणGovernmentसरकार