लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : बंद घराच्या दरवाजाचा लॅचलॉक तोडून चोरट्यांनी ७० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि़८) सकाळच्या सुमारास वडाळानाका परिसरातील रेणुकानगरमध्ये भागात घडली. परवेज खान चौहखान यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी सकाळच्या सुमारास खान कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे लॅचलॉक तोडून घरात प्रवेशर केला ़ तसेच घरातील बेडरूममध्ये असलेल्या कपाटातून ७० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेणुकानगरला भरदिवसा घरफोडी
By admin | Updated: May 9, 2017 16:55 IST