शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

रिंगरोडची टोलवाटोलवीं

By admin | Updated: July 7, 2014 00:14 IST

रिंगरोडची टोलवाटोलवीं

 

वसंत तिवडे

त्र्यंबकेश्वरआगामी सिंहस्थ आराखड्यातून त्र्यंबकेश्वरातील महत्त्वाचा असलेल्या रिंगरोडचा निम्मा भाग वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्तकेले जात आहे, तर याबाबत नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग टोलवाटोलवी करीत असून, दोन्ही विभाग झाल्या चुकीची जबाबदारी स्वीकारताना दिसत नाहीत. शहराच्या रहदारीला अडथळा निर्माण होऊ नये या हेतूने १९९२-९३च्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी शहरातील सर्व अखाड्यांना जोडणारा रस्ता म्हणून रिंगरोडची निर्मिती करण्यात आली होती. त्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सदरील रिंगरोडच्या विकासाचे व नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते; मात्र अर्ध्याच रस्त्याच्या विकासाचे काम मंजूर आराखड्यानुसार होणार असून, उर्वरित रस्त्याचे काय होणार याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबक पालिकेसाठी ३७ कोटींचा निधी मंजूर झाला असून, त्याअंतर्गत विविध दहा कामांचा समावेश आहे. यात रस्ता कॉँक्रिटीकरण, वाहनतळ विकास, शेड बांधकाम, शौचालय बांधकाम, पथदीप, आरोग्य व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन आदि कामांचा समावेश केला गेला असताना मात्र, निरंजनी अखाडा ते रिंगरोड जेथून सुरू होतो त्या नाशिक - त्र्यंबक रस्त्यापर्यंतच्या रस्त्याचा समावेश ना पालिकेने केला, ना सार्वजनिक बांधकाम विभागाने केला. त्यामुळे सदरचा रस्ता आता विकासापासून वंचित राहण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते निरंजनी अखाड्यापर्यंतच्या रस्त्यासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. तेथून पुढचे सुमारे दीड कोटीचे काम मात्र मंजुरीअभावी लटकले आहे. त्यामुळे सिंहस्थाच्या पुरवणी आराखड्यात सदरील कामाचा समावेश करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.