शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

माहितीच्या अधिकाराचा जाच; गैरवापरच अधिक : महापालिकेत बोगस माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:05 IST

नाशिक : पारदर्शक कारभारासाठी माहितीचा अधिकार उपयुक्त ठरत असला तरी, या कायद्याचा गैरवापरच अधिक होऊ लागल्याने महापालिकेला त्याचा जाच वाटू लागला आहे. महापालिकेत माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा सुळसुळाट झाला असून, वर्षभरात विविध विभाग मिळून सुमारे साडेपाचशेहून अधिक अर्ज प्राप्त होत असल्याचे चित्र आहे. या अर्जांना उत्तर देण्यातच महापालिकेची बरीचशी प्रशासकीय यंत्रणा जुंपल्याने त्याचा दैनंदिन कामकाजावरही परिणाम दिसून येत आहे.

ठळक मुद्देमाहितीच्या अधिकाराचा जाचगैरवापरच अधिक : महापालिकेत बोगस माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा सुळसुळाट

नाशिक : पारदर्शक कारभारासाठी माहितीचा अधिकार उपयुक्त ठरत असला तरी, या कायद्याचा गैरवापरच अधिक होऊ लागल्याने महापालिकेला त्याचा जाच वाटू लागला आहे. महापालिकेत माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा सुळसुळाट झाला असून, वर्षभरात विविध विभाग मिळून सुमारे साडेपाचशेहून अधिक अर्ज प्राप्त होत असल्याचे चित्र आहे. या अर्जांना उत्तर देण्यातच महापालिकेची बरीचशी प्रशासकीय यंत्रणा जुंपल्याने त्याचा दैनंदिन कामकाजावरही परिणाम दिसून येत आहे.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सन २००१ मध्ये माहितीच्या अधिकारासाठी आंदोलनाचे रणशिंग फुंकल्यानंतर आॅक्टोबर २००५ मध्ये माहितीचा अधिकार अधिनियम अंमलात आला. प्रशासनाच्या कारभारात सामान्य जनतेला प्रत्यक्ष हस्तक्षेप करता येत नसला तरी त्यावर नियंत्रण ठेवता येणे शक्य आहे. प्रत्येकाला सरकारी कारभार जाणून घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे माहितीचा अधिकार पारदर्शक कारभारासाठी उपयुक्त ठरला. परंतु, हाच माहितीचा अधिकार आता महापालिकेला जाच वाटू लागला असून, विविध विभागमिळून वर्षभरात सुमारे ५५० हून अधिक अर्ज प्राप्त होत असल्याची स्थिती आहे. प्रामुख्याने, आरोग्य, वैद्यकीय, बांधकाम, विद्युत, भुयारी गटार, अतिक्रमण, मिळकत आणि नगररचना या विभागांमध्ये माहितीच्या अधिकाराचे अर्ज येण्याचे प्रमाण अधिक आहे. त्या-त्या विभागात माहिती अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. परंतु, प्राप्त अर्जांमध्ये बोटावर मोजण्याइतपत अर्जांमागेच माहिती मागविण्याचा शुद्ध हेतू दिसून येत असल्याचे चित्र आहे.माहिती अधिकार अधिनियमान्वये प्राप्त अर्जावर ३० ते ४८ दिवसांच्या आत उत्तर द्यायचे असते. मुदतीत माहिती दिली नाही तर कारवाईची टांगती तलवार असते. ठराविक चेहºयांचीच गर्दीमहापालिकेत माहिती अधिकाराचा वापर करणाºया ठराविक चेहºयांचीच गर्दी दिसून येते. महापालिका मुख्यालयात राजीव गांधी भवनमध्ये दिवसभर ठाण मांडत विविध मुद्द्यांवर माहिती मागविणाºयांची एक टोळीच कार्यरत असल्याची चर्चा आहे. महापालिकेकडे प्राप्त होणाºया अर्जांमध्ये एकाच व्यक्तीने विविध विभागांकडे केलेल्या अनेक अर्जांचा समावेश आहे. काही लोकप्रतिनिधींकडूनही या कार्यकर्त्यांना आश्रय दिला जात असल्याची चर्चा आहे. बोगस माहिती अधिकार कार्यकर्त्यांना पायबंद घालण्यासाठी कायद्यात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.