शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अपंग प्रमाणपत्र देण्याचे अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:38 IST

राज्यातील अपंगांचे असलेले प्रमाण व त्या तुलनेत त्यांना प्रमाणपत्र देणाºया संस्थांची मर्यादित संख्या लक्षात घेता राज्य सरकारने राज्यातील महापालिकेच्या रुग्णालयांना अपंगांना अपंगत्व प्रमाणपत्र देण्याचे अधिकार बहाल केले असून, तसे आदेश मंगळवारी काढण्यात आले. प्रहार क्रांती मोर्चाचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांनी आझाद मैदानावर केलेल्या अन्नत्याग आंदोलनानंतर शासनाने हे पाऊल उचलले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे नाशिक महापालिकेच्या दोन रुग्णालयांतून यापुढे अपंगांना प्रमाणपत्र मिळणार आहे.

नाशिक : राज्यातील अपंगांचे असलेले प्रमाण व त्या तुलनेत त्यांना प्रमाणपत्र देणाºया संस्थांची मर्यादित संख्या लक्षात घेता राज्य सरकारने राज्यातील महापालिकेच्या रुग्णालयांना अपंगांना अपंगत्व प्रमाणपत्र देण्याचे अधिकार बहाल केले असून, तसे आदेश मंगळवारी काढण्यात आले. प्रहार क्रांती मोर्चाचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांनी आझाद मैदानावर केलेल्या अन्नत्याग आंदोलनानंतर शासनाने हे पाऊल उचलले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे नाशिक महापालिकेच्या दोन रुग्णालयांतून यापुढे अपंगांना प्रमाणपत्र मिळणार आहे.  सध्या राज्यातील १६ वैद्यकीय महाविद्यालये व ३६ सार्वजनिक आरोग्य विभागाकडील रुग्णालयांच्या माध्यमातून अपंग व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात येत असून, राज्यात डिसेंबर २०१२ पासून शासनाने प्रमाणपत्र संगणकीय देण्यास सुरुवात केली आहे. मात्र राज्यात २७ लाख अपंग असताना त्यांना प्रमाणपत्र देणाºया संस्था अपुºया आहेत. त्यामुळे वेळेत प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या तक्रारी अपंगांकडून केल्या जात असून, याच मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन छेडले आहे. अपंगांना संगणकीय प्रणालीद्वारे अपंगत्वाचे प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळावे, यासाठी शासनाने प्रमाणपत्र देणाºया संस्थांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड, नाशिक, नवीन मुंबई व ठाणे या महापालिकांच्या रुग्णालयांना याबाबतचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत.अर्ज केल्यानंतर एक महिन्यात प्रमाणपत्रनाशिक शहराच्या कार्यक्षेत्रातील अपंगांना यापुढे महापालिकेच्या बिटको रुग्णालय व डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटल या दोन रुग्णालयांतून अपंगाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. अपंगांनी अर्ज केल्यानंतर जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत प्रमाणपत्र अदा केले जावे, असा दंडकही शासनाने घालून दिला आहे.