शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रबंधकांना रिक्षाचालकांचा घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:42 IST

नाशिकरोड रेल्वेस्थानकाची तपासणी करण्यास आलेले भुसावळ विभागाचे प्रबंधक आर. के. यादव यांना रिक्षा स्टॅण्डच्या रॅकमध्ये लोखंडी लेन टाकू नये म्हणून रिक्षाचालकांनी घेराव घालून विरोध केला. दरम्यान, यादव यांनी नाशिकरोड व देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकाची पाहणी करून तपासणी करत माहिती घेतली.

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकाची तपासणी करण्यास आलेले भुसावळ विभागाचे प्रबंधक आर. के. यादव यांना रिक्षा स्टॅण्डच्या रॅकमध्ये लोखंडी लेन टाकू नये म्हणून रिक्षाचालकांनी घेराव घालून विरोध केला. दरम्यान, यादव यांनी नाशिकरोड व देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकाची पाहणी करून तपासणी करत माहिती घेतली. रेल्वेच्या भुसावळ विभागाचे प्रबंधक आर. के. यादव, वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक सुनीलकुमार मिश्रा व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकाची पाहणी करून तपासणी केली. यादव नाशिकरोड रेल्वेस्थानकाची पाहणी करण्यास येणार असून, रिक्षा स्टॅण्डच्या रॅकमध्ये लोखंडी लेन टाकण्यास रिक्षाचालकांचा तीव्र विरोध असल्याने सकाळपासून रिक्षाचालकांनी रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ बंद पुकारला होता. यामुळे रेल्वेने आलेल्या प्रवाशांना रिक्षाचालकांच्या बंदमुळे सामान घेऊन बाहेरील रिक्षा स्टॅन्डपर्यंत पायपीट करावी लागली.  गेल्या ३०-४० वर्षांपासून या ठिकाणी प्रवासी वाहतूक करण्याचा व्यवसाय करत आहे. रिक्षा स्टॅण्ड रॅकमध्ये सलग पाच रिक्षा एका रांगेत लागू शकतात. सध्या रॅकमध्ये काही अंतर सोडून लावलेल्या लोखंडी लेनमुळे अगोदरच मोठी अडचण होत आहे. काही अंतर सोडून असलेले लोखंडी लेन सरसकट केल्यास पाच लाईनमध्ये रिक्षा बसणार नाही. त्यामुळे रिक्षा रेल्वेस्थानकाच्या आवारात उभ्या केल्यास वाहतुकीला अडथळा निर्माण होईल. ओलासारख्या खासगी प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांसाठी रिक्षा स्टॅण्डच्या रॅकमध्ये लोखंडी लेन लावून जागा उपलब्ध करून देण्यास आमचा तीव्र विरोध आहे, असे रिक्षाचालकांनी यादव यांना सांगितले. त्यानंतर यादव यांनी स्थानकाची पाहणी करून सरकता जिना व इतर सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी नाशिकरोड रेल्वेस्थानक अधीक्षक आर. के. कुठार व रेल्वेचे इतर अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे