शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
5
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
6
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
7
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
8
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
9
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
10
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
11
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
12
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
13
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
14
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
15
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
16
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
17
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
18
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
19
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
20
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!

रिक्षा परवाने नूतनीकरणासाठी नवे धोरण

By admin | Updated: January 31, 2015 23:44 IST

रावते यांची घोषणा : युनियन पदाधिकाऱ्यांची झाडाझडती; श्रमिक सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा बहिष्कार

नाशिक : रिक्षांच्या परवाने नूतनीकरणाबाबत लवकरच धोरण ठरविण्यात येणार असल्याची घोषणा करून, परवाने नूतनीकरण करण्यास हलगर्जीपणा करणाऱ्या रिक्षाचालकांबाबत त्यांच्या युनियन फक्त वर्गणीच गोळा करतात काय? असा सवाल परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केला. परिवहनमंत्र्यांकडून युनियनच्या पदाधिकाऱ्यांचीच झाडाझडती सुरू झाल्याने श्रमिक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना अखेर बहिष्कार टाकावा लागला. शहरातील रिक्षा व टॅक्सीचालकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी परिवहनमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत सहा महिन्यांच्या आत रिक्षा परवाना नूतनीकरण न करणाऱ्या रिक्षांचे परमिट रद्द करून रिक्षा मोडीत काढण्याच्या नोटिसा परिवहन विभागाने बजावल्याची तक्रार संघटनांकडून करण्यात आली. त्याचबरोबर आॅनलाइन रिक्षा परवाने देण्यासाठी दहावी शिक्षणाची अटही जाचक असून, अशिक्षित रिक्षाचालकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याचे सांगण्यात आले. कोणत्याही कायद्यात परवाना रद्द करण्याची तरतूद नसताना परिवहन विभाग अन्याय करीत असल्याची तक्रार करण्यात आली. त्यावर प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड यांनी प्रशासनाची बाजू मांडताना यासंदर्भात २०१३ मध्ये निर्णय घेण्यात आला असून, अ‍ॅटो रिक्षा परवान्यांची मुदत संपण्यापूर्वीच रिक्षाचालकांनी अर्ज करून मुदतवाढ घ्यावी, सहा महिन्यांत नूतनीकरण करावे, त्यानंतरही जे करणार नाहीत त्यांचे परवाने नूतनीकरण न करता रिक्षा मोडीत काढावी, असा कायदा करण्यात आला आहे. रिक्षाचालकांना वेळोवेळी आवाहन करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगितले. शहरात पाच हजार आॅनलाइन परवाने देण्याचे धोरण असताना परिवहन विभागाने नूतनीकरण न झालेले ३३३३ परवाने रद्द करून फक्त १६६७ परवानेच दिल्याची तक्रारही करण्यात आली. त्यावर लवकरच यासंदर्भात धोरण ठरविण्याचे आश्वासन परिवहनमंत्र्यांनी दिले. ओला टॅक्सीबाबत लवकरच कडक निर्बंध करण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)