शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात रिक्षाचालकाचा खून : मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 00:14 IST

सिडको : परिसरातील महालक्ष्मीनगर येथे रिक्षाचालकाचा खून झाल्याची घटना बुधवारी (दि. २७) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. साहेबराव निंबा जाधव (३१) असे मयत रिक्षाचालकाचे नाव आहे. रिक्षाचालकांच्या आपसी वादातून ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला असून, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़ 

ठळक मुद्दे रिक्षाचालकाचा खूनरिक्षाचालकांच्या आपसी वादातून घटना घडल्याचा अंदाज

सिडको : परिसरातील महालक्ष्मीनगर येथे रिक्षाचालकाचा खून झाल्याची घटना बुधवारी (दि. २७) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. साहेबराव निंबा जाधव (३१) असे मयत रिक्षाचालकाचे नाव आहे. रिक्षाचालकांच्या आपसी वादातून ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला असून, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़  दरम्यान, हल्लेखोरांच्या तपासासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले़ महालक्ष्मीनगरमध्ये रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रिक्षाचालकांमध्ये वाद झाला. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी पाठीमागून लाकडी दंडुका व धारधार शस्त्राने जाधव याच्यावर हल्ला केला. यामध्ये जाधव गंभीर जखमी झाल्याने जमिनीवर कोसळला. घटनेची माहिती मिळताच उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी जाधव यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकिय अधिकाºयांनी तपासून मयत घोषीत केले़जिल्हा रुग्णालयात जमलेल्या मयत जाधवच्या नातेवाईकांनी आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेहाचा पंचनामा न करण्याची भूमिका घेतली़ यावेळी झालेल्या गोंधळामुळे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. साहेबराव जाधवच्या भावाने संशयित दर्शन दोंदे, गणेश शेंडके व त्याच्या साथीदारांनी खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. तसेच गत तीन-चार महिन्यांपासून संशयित फोनवरून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे सांगितले.जिल्हा रुग्णालयात जाधवच्या नातेवाईकांना सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गोरे व वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ते ऐकण्याचा मनस्थितीत नव्हते़ अंबड पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून उर्वरीत सर्व हल्लेखोरांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाल्याचे गोरे यांनी सांगितल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील तणाव निवळला़ दरम्यान, मयत जाधवच्या पश्चात आई, पत्नी दोन लहान मुले असा परिवार आहे़