शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकाने पैशांचे पाकीट केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:43 IST

गेल्या ७ तारखेला द्वारका चौकातून के. के. वाघ महाविद्यालयात जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या विद्यार्थ्याचे पाकीट रिक्षातच राहिल्याने सदर पाकीट पोलिसांच्या समक्ष त्यास परत केल्याने रिक्षाचालक जावेद सय्यद यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नाशिक : गेल्या ७ तारखेला द्वारका चौकातून के. के. वाघ महाविद्यालयात जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या विद्यार्थ्याचे पाकीट रिक्षातच राहिल्याने सदर पाकीट पोलिसांच्या समक्ष त्यास परत केल्याने रिक्षाचालक जावेद सय्यद यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.द्वारका चौकात उभे असताना सकाळच्या सुमारात त्यांच्या रिक्षात के. के. वाघ महाविद्यालयातील विद्यार्थी बसला. त्याला सोडून रिक्षाचालक सय्यद परत आले असता त्यांना रिक्षात जावेदचे पाकीट आढळले. त्यामध्ये पाच हजार रुपये रोख, कॉलेजचे ओळखपत्र, एटीएम कार्ड, आधार कार्ड व पॅन कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे होती. सय्यद यांनी सदर बाब श्रमिक सेनेचे स्टॅन्ड अध्यक्ष अलीम शेख यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर भगवंत पाठक, अलिम शेख, अश्पाक सय्यद यांनी त्वरित भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी यांच्याशी संपर्क करून पाकीट त्यांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तत्काळ संबंधित विद्यार्थ्याशी संपर्क साधून त्याला पोलीस ठाण्यात बोलाविले. ओळख पटविण्यात आल्यानंतर पाकीट विद्यार्थ्याच्या ताब्यात देण्यात आले.सय्यद यांच्या प्राामणिक-पणाबद्दल संबंधित विद्यार्थी आणि पोलिसांनीदेखील सय्यद यांचे आभार मानले. सय्यद सारखे प्रामाणिक रिक्षा चालक आपल्या हद्दीत असल्याचा अभिमान वाटतो असे पोलिस निरिक्षक सूर्यवंशी यांनी आभार मानले़

टॅग्स :Nashikनाशिक