पंचवटी : मखमलाबाद नाक्यावरील क्रांतिनगर परिसरात एका शेडखाली उभी असलेली रिक्षा सोमवारी पहाटेच्या सुमाराला जळाल्याची घटना घडली आहे. सदर रिक्षा जळाली की जाळली याबाबत स्पष्टोक्ती मिळाली नाही. याबाबत क्रांतिनगर परिसरात राहणाऱ्या दिलीप मुर्तडक यांनी पंचवटी पोलिसांत खबर दिली आहे. मुर्तडक यांची रिक्षा (क्र.एम.एच. १५ जे. ४६६३) परिसरातील एका शेडखाली उभी केलेली असताना सोमवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमाराला काहीतरी जळाल्याचा वास आल्याने नागरिक जागे झाले त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सदर रिक्षा विझविण्याचा प्रयत्न केला रिक्षा जळाल्याबाबत मनोहर पवार यांनी मुख्य अग्निशामक दलाला माहिती कळविल्यानंतर पंचवटी अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत सदरची रिक्षा पाण्याच्या साहाय्याने विझविली. परिसरातीलच कोणीतरी अज्ञात समाजकंटकांनी दहशत निर्माण करण्याच्या हेतूने जाळली असावी, अशी चर्चा क्रांतिनगर भागातील नागरिकांत सुरू आहे. (वार्ताहर)
रिक्षाची जाळपोळ?
By admin | Updated: January 31, 2017 00:40 IST