शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सधन शेतकºयांच्या वीज सवलतीबाबत फेरविचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:09 IST

रबावनकुळे : कंपनीचे २७ हजार कोटी थकीत नाशिकरोड : महावितरण कंपनीचे वीजबिलापोटी २७ हजार कोटी रुपये थकीत असून, कंपनी सुरू ठेवण्यासाठी व ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी थकबाकी वसूल करणे क्रमप्राप्त झाले आहे. शेतकºयांना सवलतीच्या दरात १ रुपया दराने वीज दिली जाते. मात्र जे सधन शेतकरी, बागायतदार आहेत त्यांना सवलतीऐवजी नियमित दराने वीज देण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

रबावनकुळे : कंपनीचे २७ हजार कोटी थकीत

नाशिकरोड : महावितरण कंपनीचे वीजबिलापोटी २७ हजार कोटी रुपये थकीत असून, कंपनी सुरू ठेवण्यासाठी व ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी थकबाकी वसूल करणे क्रमप्राप्त झाले आहे. शेतकºयांना सवलतीच्या दरात १ रुपया दराने वीज दिली जाते. मात्र जे सधन शेतकरी, बागायतदार आहेत त्यांना सवलतीऐवजी नियमित दराने वीज देण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे म्हणाले, नाशिक जिल्ह्णासाठी ३३ केव्हीच्या ५९ उपकेंद्रांचे नियोजन आहे. नाशिक शहर विद्युतीकरणासाठी ५० कोटीचा निधी दिला जाणार आहे. वीजतारा भूमिगत करण्यासाठी नागपूरप्रमाणे नाशिक महानगरपालिकेने महासभेत ठराव केल्यास डॅमेज चार्जेस देत वीज वाहिन्या भूमिगत करून देऊ, असे बावनकुळे यांनी सांगितले. नाशिकच्या इंडिया बुल कंपनीशी सरकारचा करार झालेला नाही. कारण त्यांची वीज महाग पडणार आहे. उद्योजक, व्यापारी अशा कोणालाच ती परवडणारी नाही, असेही ते म्हणाले.बंद पडलेली डीपी दुरुस्त करण्यासाठी ने-आण करताना वाहतूक खर्च शासनाकडून दिला जातो; मात्र ग्रामीण भागात शेतकºयांना वर्गणी काढून डीपी दुरुस्तीसाठी ने-आण करावी लागते हे अत्यंत चुकीचे असून, त्याची चौकशी केली जाईल. कर्मचारी संख्या अपुरी असल्याने विजेची कामे होत नाहीत. त्यामुळे आउटसोर्सिंग तत्त्वावर कर्मचारी नेमण्याचे अधिकार अधीक्षक अभियंत्यांना दिले असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. अ‍ॅव्हरेज बिल देणे चुकीचे असून, त्यामुळे महावितरणच्या अ‍ॅपला आगामी चार महिन्यात सर्व ग्राहकांना जोडले जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.एकलहरे प्रकल्प रद्द नाहीएकलहरे येथील मंजूर ६६० मेगावॅटचा प्रकल्प कधी सुरू होणार याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकलहरे येथील वीजनिर्मिती दर साडेपाच रुपये पडत आहे. लांबवरून कोळसा वाहतूक करून वीज निर्मिती करणे महाग पडत आहे. त्यामुळे वीजनिर्मिती दर कमी कसा राहील, याचा विचार शासन करत आहे. साडेपाच रुपये दराची वीज ग्राहकांना परवडणारी नाही व ती स्वीकारली जाणार नाही. एकलहरेचा प्रकल्प रद्द केलेला नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.