शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महिला बचतगटांच्या प्रस्तावांची फेरपडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:31 IST

जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गंत चालविल्या जाणाऱ्या अंगणवाड्यांना महिला बचत गटांमार्फत ताजा व सकस आहार पुरविण्याचा निर्णय शासनस्तरावर आठ महिन्यांपूर्वी घेण्यात येऊन महिला बचत गटांकडून प्रस्तावही मागविण्यात आले असून, अंगणवाड्यांसाठी दाखल झालेल्या प्रस्तावांची छाननी करून त्यांची फेरपडताळणी केली जात आहे. मात्र खासगी ठेकेदार नको म्हणून शासनाने हा निर्णय घेतलेला असला तरी, गेल्या आठ महिन्यांपासून ठेकेदारामार्फतच अंगणवाड्यातील बालकांना पोषण आहाराचा पुरवठा केला जात आहे.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गंत चालविल्या जाणाऱ्या अंगणवाड्यांना महिला बचत गटांमार्फत ताजा व सकस आहार पुरविण्याचा निर्णय शासनस्तरावर आठ महिन्यांपूर्वी घेण्यात येऊन महिला बचत गटांकडून प्रस्तावही मागविण्यात आले असून, अंगणवाड्यांसाठी दाखल झालेल्या प्रस्तावांची छाननी करून त्यांची फेरपडताळणी केली जात आहे. मात्र खासगी ठेकेदार नको म्हणून शासनाने हा निर्णय घेतलेला असला तरी, गेल्या आठ महिन्यांपासून ठेकेदारामार्फतच अंगणवाड्यातील बालकांना पोषण आहाराचा पुरवठा केला जात आहे.राज्यातील अंगणवाड्यातील बालकांना पूर्वी महिला बचत गटांमार्फत पोषण आहाराचा पुरवठा केला जात होता. मात्र त्यानंतर शासनाने खासगी ठेकेदारांमार्फत पोषण आहाराचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. साहजिकच ठेकेदारांमार्फत या योजनेतही गैरप्रकार सुरू करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या संगनमताने निकृष्ट आहार पुरविण्याबरोबरच बालकांची संख्या अधिक दाखवून अनुदान लाटण्याचे प्रकार घडू लागल्याने तक्रारी शासन स्तरावर करण्यात आल्या, परंतु तत्कालीन सरकारने त्याची दखल न घेतल्याने याबाबत उच्च व सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्याची दखल घेऊन सर्वाेच्च न्यायालयाने अंगणवाड्यांना स्थानिक पातळीवरच महिला बचत गटांमार्फत पोषण आहार पुरविण्याचा ठेका देण्याबाबत शासनाला निर्देश दिले. त्यानुसार मे २०१९ मध्ये शासनाने आहार पुरविण्याबाबतचे नियमावली तयार करून निविदा काढल्या होत्या. जुलै ते आॅगस्ट या दरम्यान, महिला बचत गटांकडून याबाबतचे प्रस्ताव मागविण्यात आले. त्यानुसार या प्रस्तावांची छाननी करण्यात आली असून, महिला बचत गटांनी पोषण आहाराचा ठेका मिळण्यासाठी ज्या कागदपत्रांची वा माहिती दिली आहे, त्याची प्रत्यक्ष भेट देऊन खात्री करण्याची जबाबदारी तहसीलदारांवर सोपविण्यात आली असून, त्यांच्याकडून येत्या २५ जानेवारीपर्यंत अहवाल अपेक्षित आहे़जिल्ह्णात अंगणवाड्यांची संख्या जवळपास पाच हजारांच्या आसपास असून, आहार पुरविण्यासाठी दीडशे महिला बचत गटांचे प्रस्ताव महिला व बाल कल्याण विकास विभागाला प्राप्त झाले आहेत. अंगणवाड्यांसाठी पोषण आहार पुरवू पाहणाºया महिला बचत गटांना पात्र ठरण्यासाठी काही अटी-शर्ती टाकण्यात आल्या आहेत.

टॅग्स :foodअन्न