शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित मूल्यांकनाचा प्रस्ताव : १ एप्रिल २०१७ नंतरच्या मिळकतींचा समावेश नवीन मिळकतींची घरपट्टी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:43 IST

महापालिकेने दि. १ एप्रिल २०१७ नंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या अथवा येणाºया मिळकतींच्या करांचे मूल्यांकनाचे वाजवी भाडे सुधारित करण्याचा प्रस्ताव तयार केला असून, येत्या महासभेत तो मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

नाशिक : महापालिकेने दि. १ एप्रिल २०१७ नंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या अथवा येणाºया मिळकतींच्या करांचे मूल्यांकनाचे वाजवी भाडे सुधारित करण्याचा प्रस्ताव तयार केला असून, येत्या महासभेत तो मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. सदर प्रस्ताव मंजूर झाल्यास नव्याने अस्तित्वात येणाºया मिळकतींच्या घरपट्टींमध्ये त्या-त्या भागातील रेडीरेकनरनुसार वाढ होऊन महापालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे.नाशिक महापालिकेने कर योग्य मूल्याचे दर सन १९९९-२००० मध्ये सुधारित केले होते. त्यानंतर अद्याप १७ वर्षांत मूल्यांकनाचे दर सुधारित करण्यात आलेले नाही. त्यामुळे महाराष्टÑ शासनाच्या प्रधान महालेखाकारांनी वेळोवेळी आक्षेप नोंदविलेले आहेत. केंद्र सरकार प्रतिवार्षिक महागाई निर्देशांक निश्चित करत असतात. त्यानुसार, सन १९९९-२००० मध्ये महागाई निर्देशांक ३८९ रुपये होता. तर आता सन २०१६-१७ मध्ये तो ११२५ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. यामध्ये सुमारे २८९.२० टक्के इतकी वाढ झालेली आहे. महाराष्टÑ शासनाच्या रेडी रेकनरचा सन १९९९ मधील नाशिक महापालिका हद्दीतील मिळकती व जमिनीचा किमान दर हा ५२२० रुपये होता तर सन २०१७-१८ मध्ये तो किमान २२,२०० रुपये झालेला आहे. यामध्ये सुमारे ४२५.२८ टक्के इतकी वाढ झालेली आहे. याप्रमाणे जर महापालिकेने विचार केल्यास मूल्यांकनाचे वाजवी भाड्याचे आरसीसी, निवासी मालमत्तेचा कमाल दर प्रति चौ.फुटास ०.५० आहे. त्यामध्ये ४२५.२८ टक्के वाढ केल्यास त्याचा सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात प्रति चौ.फुटास दर २.१२ रुपये इतकी वाढ होणे अपेक्षित आहे. तसेच आरसीसी, बिगर निवासी मालमत्तेचा कमाल दर प्रति चौ.फुटास १.८० रुपये असून, त्यामध्ये ४२५.२८ टक्के वाढ केल्यास त्याचा सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात प्रति चौ. फुटास दर ७.६५ रुपये इतका होणे अपेक्षित आहे.जुन्या मिळकतींत बदल नाहीअधिनियमातील तरतुदीनुसार ज्या मिळकतींचे मूल्यांकन निश्चित करण्यात आलेले आहे. परंतु, ज्या मिळकतींमध्ये (वापरात बदल, वाढीव बांधकाम, भाडेकरू, बांधकामात बदल) कोणताही बदल केलेला नाही. अशा मिळकतींच्या मूल्यांकनामध्ये बदल करता येत नाही. त्यामुळे दि. ३१ मार्च २०१७ पूर्वीच्या अस्तित्वात असलेल्या मिळकतींच्या मूल्यांकनात कोणताही बदल केला जाणार नसल्याचे आयुक्तांनी प्रस्तावात स्पष्ट केले आहे. सदर मूल्यांकनाचे दर निश्चित करण्याचे अधिकार आयुक्तांना प्रदान करण्याचेही प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.