शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

धरणावर जीवन प्राधिकरणाची आढावा बैठक

By admin | Updated: June 27, 2014 00:17 IST

धरणावर जीवन प्राधिकरणाची आढावा बैठक

 

मालेगाव : तालुक्यातील लुल्ले धरण कार्यस्थळावर जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन मंडळ अधिकारी सुदर्शन कालिके यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी माळमाथ्यावरील २५ गावांसाठी नव्याने मंजूर करण्यात आलेली प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याची सूचना आमदार दादा भुसे यांनी केली.आॅक्टोबर २०१२ मध्ये या योजनेच्या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. गेल्या मार्च महिन्यात योजना पूर्णत्वास येणे अपेक्षित असताना अद्याप योजनेची कामे मार्गी लागली नाहीत. त्यामुळे माळमाथ्यावरील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर भुसे यांनी तातडीने योजनेच्या कामांचा आढावा सादर करण्याच्या सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. उपअभियंता मोरे यांनी प्राथमिक माहिती दिली. करंजगव्हाण, हाताणे, टोकडे, जळकू जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. करंजगव्हाणला दोन्ही जलकुंभाचा वापर केला जात आहे. याच बरोबर झालेली कामे व अपूर्ण कामे या विषयी त्यांनी चर्चा केली. जलशुद्धीकरण यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत झाल्यानंतर या गावांना शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल. त्यामुळे काही गावांनी स्थानिक पाणीपुरवठा योजनांना प्राधान्य दिल्याने जोडणी घेतली नसेल तरी जलकुंभ व वितरण प्रणाली अद्यावत ठेवा, अशा सूचना भुसे यांनी केली.लुल्ले, डोंगराळे, गरबड, विराणे, जळकू, कंधाणे येथे पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी स्थानिक ग्रामस्थांनी केल्या. जीवन प्राधिकरणने तातडीने विद्युत जनित्राचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवावा व मंजूर करुन घ्यावा. वीज नसली तरी जलशुद्धीकरण व पाणी वितरण यंत्रणेत खंड पडू नये, अशा सूचना केल्या. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम लवकर पूर्ण होणे अपेक्षित आहे. (वार्ताहर)नाही, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देताना मोठ्या मुश्किलीने योजनेला मंजुरी मिळविली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात काम पूर्ण करा, अशा सूचना आमदार भुसे यांनी केल्या. त्याचप्रमाणे फिल्ट्रेशन प्लाँटचे कामदेखील ७० टक्के पूर्ण झाले असून, लवकरच शुद्ध व मुबलक पाणी योजनेत समाविष्ट असलेल्या २५ गावांना देण्यात येईल.बैठकीस अधीक्षक अभियंता कालिके, कार्यकारी अभियंता मोरे, उपअभियंता सोनवणे, शाखा अभियंता खरे, वाघ, मोहिद्दीन आदि अधिकारी उपस्थित होते. चर्चेत पंचायत समिती सदस्य अण्णा पवार, दिनकर चव्हाण, कृष्णा चव्हाण, बंटी चव्हाणू, विजू चव्हाण, दीपक चव्हाण, बन्सीलाल चव्हाण, रामचंद्र मिसाळ, संजय बोरसे, रवींद्र चव्हाण, समाधान ठोंबरे, डिगा परदेशी, मनोहर ठाकरे, संजय ह्याळीज, राजेंद्र पाटील, मनोहर ह्याळीज, समाधान खैरनार, बन्सीलाल कचवे, भाऊसाहेब भामरे, चैत्राम गर्दे, धनराज पवार, गंगाराम गर्दे, शंकुष थोरकर, प्रवीण इंगळे, अंतू देवरे आदिंनी सहभाग घेतला.