शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

परवाने परत केले, संचालकपदाचे काय?

By admin | Updated: July 22, 2016 00:12 IST

बाजार समिती : जिल्ह्यातील व्यापारी गटाच्या २८ प्रतिनिधींबाबत प्रश्नचिन्ह

 संजय वाघ नाशिकजिल्ह्यातील १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांशी निगडित व्यापाऱ्यांनी परवाने तर परत केले; पण ज्या परवान्याच्या आधारे निवडणूक जिंकली त्या संचालकपदाचे काय, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. परवाने नसलेल्या व्यापारी संचालकांचे पद आता धोक्यात आले असून, याबाबत जिल्हा निबंधक काय पावले उचलतात याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागून आहे.फळे व भाजीपाला नियमनमुक्त करून बाजार समितीचे त्याच्यावर नियंत्रण राहणार नाही, असा निर्णय राज्य सरकारने २८ जूनला घेतला होता. या निर्णयावर व्यापारीवर्गाने नाराजी व्यक्त करीत राज्यातील बाजार समित्यांमधील व्यापारी व आडत्यांनी विरोध दर्शविला होता. सरकारच्या धोरणाविरोधात राज्यातील बहुतेक बाजार समित्यांमधील व्यापारी व आडत्यांनी असहकाराचे धोरण अवलंबून परवाने परत करण्याची मोहीम उघडली होती. त्यात नाशिक जिल्ह्यातील आठ बाजार समिती कार्यक्षेत्रातील १५४६ व्यापाऱ्यांनी आपले परवाने परत केले होते. त्यात कळवण (७०), सटाणा (१५३), चांदवड (११७), येवला (५९), नांदगाव (९४), दिंडोरी (३४), पिंपळगाव बसवंत (५५३) आणि लासलगाव (४६६) यांचा समावेश होता. व्यापाऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कोंडी झालेली असून, बाजार समित्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावरदेखील पाणी फिरले आहे.दरम्यान, बाजार समित्यांच्या व्यापारी गटातून निवडणूक लढविण्यासाठी परवाना (अनुज्ञप्ती) आवश्यक असतो. ज्या परवान्याच्या आधारे व्यापाऱ्यांनी निवडणूक लढवून व्यापारी संचालकपद प्राप्त केले, तोच परवाना परत करून व्यापाऱ्यांनी शासनाला व शेतकऱ्यांना एकार्थाने वेठीसच धरले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांमधील २८ व्यापारी संचालकांच्या पदाबाबत जिल्हा निबंधक काय भूमिका घेतात याबाबतही जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.