शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

भाविक परतीच्या प्रवासाला...

By admin | Updated: January 24, 2017 22:40 IST

भाविक परतीच्या प्रवासाला...

त्र्यंबकेश्वर : पौष वद्य द्वादशीला एकादशीचा उपवास काल्याच्या कीर्तनाने सोडून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या यात्रेची सांगता झाली. त्र्यंबकेश्वर येथे आलेल्या भाविकांनी निवृत्तिरायांचे दर्शन घेत जड अंत:करणाने त्र्यंबकेश्वर सोडले. दिंडीने आलेले भाविक ट्रॅक्टर, ट्रक आदि वाहनांमधून गावाकडे परतू लागले आहेत. अनेकांनी परिवहन महामंडळाच्या बसेसने परतीचा प्रवास सुरू केला आहे. यात्रेत १२ ते १५ महिला खिसेकापू पकडण्यात आल्या. विशेष म्हणजे या सर्व तरुण स्त्रिया असून, आपले कौर्यकृत्य करताना त्यांच्या कडेवर लहान बालके असतात. या खिसेकापू पकडल्या तरी पोलीस ठाण्यात त्यांची झडती घेताना ते लहान मुले मोठमोठ्याने रडत अक्षरश: पोलीस ठाणे डोक्यावर घेतात. याशिवाय ज्यांची चोरी झाली आहे तेही कोणी पोलिसांकडे फिर्याद देत नाहीत. पोलीस झंझटीत न अडकता नुकसान सहन करतात आणि त्यामुळेच या महिलांचे फावते.  त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयात अपघातात जखमी झालेले रुग्ण गणपत बारी, जव्हार फाटा, निवृत्तिनाथ मंदिराजवळ, कदम (पिंपळगाव बसवंत), पेट्रोलपंपासमोर असे ४ ते ५ रुग्ण जखमी होऊन नाशिक येथे पाठविण्यात आले आहेत तर काहीजण उपचार घेत आहेत. एका यात्रेकरूचा हृदय क्रिया बंद पडून मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस ठाण्यात खिसेकापू महिलांवर केसेस दाखल करून न्यायालयात पाठविण्यात आले आहे. परिवहन मंडळाच्या बसेसची कमी नाही. एकापाठोपाठ बस सोडण्यात येत आहेत. २८३ टायमिंगव्यतिरिक्त (२००+८३ जव्हार, पालघर)जादा बसेस सोडण्यात येत आहेत. यामध्ये थेट कळवण १४ बसेस, नांदगाव ९, येवला ६, लासलगाव ९, पेठ १५, सिन्नर २६, सटाणा १४, मनमाड १५, पिंपळगाव बसवंत १४, इगतपुरी १८, मालेगाव १५, नाशिक डेपो-१ - ६, नाशिक- २- २ याशिवाय जव्हार, पालघर ८३ तर नाशिक २०० ह्या बसेस रात्री १२ पासून आज दुपारी १.३० पर्यंत सोडण्यात आल्या आहेत. या बस सेवेवर स्वत: विभाग नियंत्रक यामिनी जोशी, आगार व्यवस्थापक किशोर पाटील, यात्राप्रमुख रणजित ढाकणे, स्थानकप्रमुख शरद झोले आदि लक्ष देऊन होते.  यात्रा जव्हार रोड परिसरात जास्त असल्याने या भागात व्यावसायिकांनी बऱ्यापैकी व्यवसाय केला. बरेच व्यावसायिकांनी धंदा नाही धंदा नाही अशी तक्रार केली. अर्थात तात्पुरते, कायम दुकानदारांचा धंदा व्हायचा तो झाला आहेच.  दरम्यान, नगरपालिकेचे नियोजन चुकले. बऱ्याच भागात पथदीप बसविले नाहीत. परिणामी अंधाराचे साम्राज्य पसरले. अनेक गल्ली-बोळात सफाई न झाल्याने कचरा जमा झाला तर गर्दीमुळे घंटागाड्या बंद करण्यात आल्या. अनेक गरीब व्यावसायिकांची छोटी छोटी दुकाने अतिक्रमणाच्या नावाखाली उठविण्यात आली किंवा ट्रॅक्टरमध्ये जमा केले तर अनेक ठिकाणी रस्त्यावरच दुकाने लावली होती तिकडे मात्र लक्षच दिले नाही. दरम्यान, बुधवारी (दि. २५) मानाच्या आलेल्या दिंडीप्रमुखांचा सत्कार समाधी संस्थानतर्फे नारळ, कुंकू, उपरणे, बुक्का लावून सत्कार करण्यात येणार आहे. निवृत्तिनाथ समाधी संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. संजयनाना धोंगडे, सचिव पवनकुमार भुतडा व अन्य विश्वस्तांच्या हस्ते सत्कार करण्यात येतो. सर्व मानाच्या दिंड्यांचे प्रमुख उपस्थित असतात.