शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केरळ सहलीच्या बुकिंगवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:17 IST

केरळमध्ये ‘निपाह’ विषाणूंची लागण व फैलाव होत असल्याने त्याचा धसका पर्यटकांनी घेतला असून, केरळमध्ये सहलीसाठी होणाऱ्या बुकिंगवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे पर्यटकांनी जम्मू, सिमला, कुलूमनाली या भागांना पसंती दिल्याचे खासगी ट्रॅव्हल्स चालकांचे म्हणणे आहे.

नाशिकरोड : केरळमध्ये ‘निपाह’ विषाणूंची लागण व फैलाव होत असल्याने त्याचा धसका पर्यटकांनी घेतला असून, केरळमध्ये सहलीसाठी होणाऱ्या बुकिंगवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे पर्यटकांनी जम्मू, सिमला, कुलूमनाली या भागांना पसंती दिल्याचे खासगी ट्रॅव्हल्स चालकांचे म्हणणे आहे.  केरळ राज्याच्या कर्नाटकाला लागून असलेल्या उत्तर भागातील ‘कलिकत’ भागामध्ये चार-पाच दिवसांपूर्वी ‘निपाह’ विषाणूंची लागण होऊन आतापर्यंत १३ पेक्षा अधिकजण मृत्युमुखी पडले आहेत. निपाहमुळे संपूर्ण केरळमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जागतिक आरोग्य संस्थेने निपाह विषाणूमुळे ‘हाय अलर्ट’ घोषित केला आहे.  निपाहच्या विषाणूचा परिणाम पर्यटकांवर झाला आहे. शाळा-महाविद्यालयांना १५ जूनपर्यंत सुट्या असल्याने देशाच्या विविध भागातून पर्यटक केरळमध्ये फिरण्यास येतात. मात्र निपाहच्या व्हायरसच्या भीतीमुळे काही पर्यटकांनी आपली नियोजित सहल रद्द केल्याचे खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी सांगितले. गेल्या ८-१० दिवसांत केरळमध्ये सहलीसाठी गेलेल्या पर्यटकांना ट्रॅव्हल्स चालकांकडून फळे खाऊ नका व काळजी घेण्याबाबतच्या सूचना केल्या जात असून, पर्यटकांशी सतत संपर्क साधला जात आहे. यापूर्वीच जून महिन्यात केरळ सहलीचे केलेले सर्व नियोजन काही पर्यटकांनी रद्द केले आहे, तर गेल्या दोन-तीन दिवसांपासून केरळच्या सहलीची नवीन बुकिंग बंद झाल्याचे ट्रॅव्हल्स चालकांनी सांगितले.  केरळच्या दक्षिण भागातील कोचीन, मुनार, पेडियार, टेकडी, अ‍ॅलप्पी बॅक वॉटर, त्रिवेंद्रम, कन्याकुमारी, रामेश्वरम, मदुराई व कोचीन या भागातच जास्त करून पर्यटक फिरण्यास, सहलीसाठी जातात.  या भागापासून केरळच्या उत्तर भागातील कलिकत जेथे निपाह विषाणूची लागण झाली आहे. हा भाग खूप दूर आहे तरीदेखील केरळ सहलीच्या बुकिंगसाठी ट्रॅव्हल्स चालक पाठविण्याची रिस्क घेण्यास तयार नाही.  केरळमध्ये निपाह विषाणूच्या संसर्गामुळे पर्यटकांनी हिमाचलातील कुलुमनाली, सिमला, जम्मू, कटरा, वैष्णवदेवी, पंजाब, अमृतसर या भागात पर्यटनासाठी प्राधान्य दिले आहे. या भागात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.यापूर्वी ज्यांनी केरळ सहलीचे नियोजन केले होते त्यापैकी काही जणांनी ‘निपाह’ विषाणू संसर्गामुळे सहल रद्द करून किंवा पुढे दिवाळीत सहलीचे नियोजन केले आहे. मात्र नव्याने जून महिन्यासाठी होणारी केरळ सहलीची बुकिंग जवळपास बंदच झाली आहे. यापूर्वी जे पर्यटक केरळला सहलीसाठी गेले आहेत त्यांच्या संपर्कात आहे.- नंदू थेटे, साई शिवम टुर्स ट्रॅव्हल्स

टॅग्स :tourismपर्यटन