शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

‘त्या’ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव

By admin | Updated: June 27, 2014 00:10 IST

‘त्या’ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव

 

सिन्नर : तालुक्यातील डुबेरेवाडी येथील सिद्धेश्वर प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या दहावीच्या ११ विद्यार्थ्यांचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाने राखून ठेवला आहे. संस्थाचालकाने सदर विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क व आवेदनपत्र न भरल्यामुळे विद्यार्थी निकालपत्र मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. संस्थाचालक, शिक्षण विभाग व परीक्षा मंडळाच्या भूमिकेमुळे संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. डुबेरेवाडी येथे सिद्धेश्वर प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा आहे. सदर शाळेच्या मान्यतेबाबत प्रश्नचिन्ह आहे. या शाळेतील दहावीच्या ११ विद्यार्थ्यांना शाळा संकेतांक नसल्याने दहावीच्या परीक्षेचे फॉर्म भरले गेले नव्हते. दहावीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसह पालक ठाणगाव येथील परीक्षा केंद्रावर आल्यानंतर त्यांच्याकडे हॉल तिकीट नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता.यावेळी पालक व विद्यार्थ्यांनी विनंती केल्यानंतर व संस्थाचालकाने या विद्यार्थ्यांची दंडासह परीक्षा फी व आवेदनपत्र भरून देण्याची तयारी दर्शविल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण मंडळाने त्यांना परीक्षेला बसू देण्याची परवानगी दिली होती. यावेळी या विद्यार्थ्यांनी इमर्जन्सी बारकोड चिटकवून पेपर दिले होते.परीक्षेच्या पहिल्या दिवशी संस्थाचालकाने परीक्षा फी व दंडापोटी असलेल्या रकमेतून सुमारे ७० हजार रुपये भरले होते. उर्वरित दंड दुसऱ्या दिवशी भरण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, उर्वरित रक्कम भरण्यासाठी सदर संस्थाचालकांशी संपर्क साधूनही त्याने पैसे भरण्यास टाळाटाळ केली होती. त्यानंतर त्याच्यासोबत वारंवार संपर्क साधूनही त्याने दंडासह परीक्षा फी तसेच विद्यार्थ्यांची कागदपत्रे पूर्ण करून दिली नाही.त्यामुळे मंडळाने या विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १७ जून रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांचा आॅनलाइन निकाल जाहीर झाला होता. त्यात या विद्यार्थ्यांचा निकाल नव्हता. गुरुवार (दि. २६) रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे शाळांतून वाटप सुरू झाले. मात्र या ११ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आल्याने त्यांचे गुणपत्रक हातात मिळाले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अधांतरी आहे. (वार्ताहर)