अंबड : माहेरून एक लाख रुपये आणावेत यासाठी पती, सासू व सासरे यांनी केलेल्या छळाला कंटाळूनच आपल्या मुलीने आत्महत्त्या केल्याची फि र्याद तेगीनकेरी यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिली असून, या प्रकरणी तिघांवर आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, निंगप्पा सातप्पा तेगीनकेरी (रा़ नागनसूर, ता़ अक्कलकोट, जि़ सोलापूर) यांची मुलगी रेवती हिचा विवाह सिडकोतील राजरत्ननगर येथे राहणार्या स्वप्नील सुरेश बागड याच्याशी झाला़ विवाहानंतर माहेरून एक लाख रुपये आणावे यासाठी पती स्वप्नील सुरेश बागड, मंगला सुरेश बागड (सासू), सुरेश पुंजू बागड (सासरे) हे एप्रिल २०१४ पासून शारीरिक व मानसिक छळ करीत होते़ या छळाला कंटाळून रेवतीने आत्महत्त्या केल्याची फि र्याद तेगीनके री यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिली आहे़ या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सहारे करीत आहेत़ (वार्ताहर)
आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल
By admin | Updated: May 21, 2014 23:44 IST