शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

गा-हाणे निवारण मंचाचा वीज कंपनीविरुद्ध निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 00:03 IST

यंत्रमागधारकास जादा बिलाची आकारणी करून वीजपुरवठा खंडित करणाऱ्या वीज कंपनीस ग्राहक गाºहाणे निवारण मंचाने जादा देयक रद्द करण्याचे आदेश देण्याबरोबरच ग्राहकास नुकसानभरपाई अदा करण्याचा निर्णय दिला आहे.

नाशिक : यंत्रमागधारकास जादा बिलाची आकारणी करून वीजपुरवठा खंडित करणाऱ्या वीज कंपनीस ग्राहक गाºहाणे निवारण मंचाने जादा देयक रद्द करण्याचे आदेश देण्याबरोबरच ग्राहकास नुकसानभरपाई अदा करण्याचा निर्णय दिला आहे.मालेगाव येथील यंत्रमागधारक रिझवान अहमद व अजहर हुसेन अन्सारी या दोघांच्या यंत्रमागाच्या वीज जोडणीचे मार्च २०१६ चे वीज मीटरचे फोटो घेण्यात आले होते. मात्र त्यांना वापरलेल्या वीज युनिटपेक्षाही दुसºयाच वीज मीटरच्या वापराचे बिल वीज कंपनीने दिले. दोन्ही यंत्रमागधारकांना साधारणत: दरमहा आठ हजार रुपये वीज बिल येत असताना कंपनीने त्यांना ४४ हजार व एक लाख ३६ हजार असे बिल दिले. या वाढीव बिलाबाबत अझहर हुसेन यांनी मालेगावी वीज कंपनीच्या उपविभागीय अधिकाºयाकडे तक्रार केली असता, त्यांनी अगोदर बिल भरा मगच तक्रार नोंदवून घेण्याचा सल्ला दिला. दरम्यान, दोन्ही यंत्रमागधारकांनी वीज कंपनीचे वाढीव देयक भरण्यास नकार दिला असता, वीज कंपनीने २५ मार्च २०१६ ते ३ एप्रिल २०१९ या काळात दोघांचाही वीजपुरवठा खंडित केला. त्यावर अजहर हुसेन यांनी ५४ हजार रुपये भरल्यावर त्यांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला. या त्रासाविरुद्ध अजहर हुसेन यांनी वीज ग्राहक न्यायमंचात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती.वीज कंपनीने रिझवान अहमद व अजहर हुसेन यांची दहा दिवस वीज बेकायदेशीर बंद केली म्हणून वीज कंपनीने दररोज १२०० रुपये भरपाई देण्याचे तसेच या ग्राहकांना जादा आकारलेली बिले रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ग्राहकास बिल दुरुस्त करून दिले नाही, म्हणून विलंबासाठी प्रतिमाह चारशे रुपयांप्रमाणे भरपाई द्यावी, असे आदेश दिले.

टॅग्स :electricityवीजCourtन्यायालय