शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
4
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
5
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
6
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
7
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! वैभव सूर्यवंशीची झंझावती खेळी, मैदानात पाडला षटकारांचा पाऊस
8
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
9
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
10
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
11
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
12
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
13
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
14
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
15
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
16
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
17
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
18
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
19
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
20
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!

‘झुलेलाल’च्या संचालकांवर नुकसानीची जबाबदारी

By admin | Updated: February 18, 2016 00:13 IST

सहा कोटींची हानी : सहनिबंधकांना अहवाल

 नाशिक : विनातारण कर्ज वाटपाबरोबरच स्वत:च्याच संस्थांना आर्थिक लाभ देणाऱ्या झुलेलाल पतसंस्थेच्या आजी-माजी संचालकांवर सुमारे सहा कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका विशेष लेखापरीक्षकांनी ठेवला असून, या संदर्भात विभागीय सहनिबंधकांना अहवाल सादर करण्यात आल्याचे वृत्त आहे. नाशिकरोड येथील झुलेलाल पतसंस्थेत आर्थिक अनियमितता झाल्याच्या कारणावरून सहकार विभागाने प्रशासकाची नियुक्ती केली होती. संस्थेत अनागोंदी कारभार, बेकायदेशीर कर्जवाटप, विना तारण कर्ज मंजुरी त्याच बरोबर चुकीचे रिबेट वाटप, कर्ज मागणी अर्ज नसताना कर्जदाराच्या कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या घेणे, कर्ज माफ करणे अशा अनेक कारणांमुळे पतसंस्था आर्थिक डबघाईस आल्याने सभासद तसेच गुंतवणूकदारांच्या ठेवी मिळणे मुश्कील झाले होते त्यामुळे सहकार खात्याने अगोदर कलम ८३ अन्वये पतसंस्थेचे लेखापरीक्षण केले असता त्यात तथ्य आढळून आले. पतसंस्थेच्या जवळपास सहा कोटी, १६ लाख रुपयांच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार कोण हे शोधण्यासाठी सर्व संचालकांची कलम ८८ अन्वये चौकशी करण्यात येऊन त्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. अलीकडेच ही चौकशी पूर्ण होऊन झुलेलाल पतसंस्थेच्या आजी-माजी अध्यक्ष व संचालकांवर त्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यात पतसंस्थेचे माजी अध्यक्ष राम साधवानी, कै. आत्माराम देवाणी, कै. श्यामसुंदर रामनानी, फागुन डियलानी, मोहन मुखी, मोहन करीरा, कै. जियाराम घिरवानी, नारायणदास चावला, कै. नंदलाल मानसिंघानी, सविता दलवानी, सोनिया हिराणी, कै. श्याम ललवानी, रामकृष्ण कळमकर, अशोक बडवे, प्रल्हाद बलदेव, विनायक कुलकर्णी, नितीन राणे, अजित गोरवाडकर यांचा समावेश आहे. या सर्वांनी वेळोवेळी संगनमत करून संस्थेचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, तसा अहवाल विभागीय सहनिबंधकांना पाठविण्यात आला आहे.