शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव मनपाचा ठराव विखंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:25 IST

मालेगाव महापालिका मालकीची जागा, गाळे खासगी संस्थांना भाडेतत्त्वावर देण्याबाबतचा महासभेचा ठराव राज्याच्या नगरविकास विभागाने विखंडित केला असून, ठरावाची अंमलबजावणी करणाऱ्या तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी. या प्रकरणात दोषी असलेल्या संबंधितांविरुद्धचा दोषारोपाचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याचा आदेश नगरविकास विभागाचे उपसचिव शं. त्र्यं. जाधव यांनी मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांना दिले आहेत.

ठळक मुद्देशासनाचा निर्णय : किदवाई रस्त्यावरील ‘वादग्रस्त’ गाळे

मालेगाव मध्य : महापालिका मालकीची जागा, गाळे खासगी संस्थांना भाडेतत्त्वावर देण्याबाबतचा महासभेचा ठराव राज्याच्या नगरविकास विभागाने विखंडित केला असून, ठरावाची अंमलबजावणी करणाऱ्या तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी. या प्रकरणात दोषी असलेल्या संबंधितांविरुद्धचा दोषारोपाचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याचा आदेश नगरविकास विभागाचे उपसचिव शं. त्र्यं. जाधव यांनी मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांना दिले आहेत. या आदेशामुळे भाडेतत्त्वावर गाळे व जागा घेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.मालेगावच्या अपर जिल्हाधिकाºयांनी चौकशी करून तसा अहवाल नाशिकच्या जिल्हाधिकाºयांना सादर केला होता. त्यांनी तो नगरविकास विभागास सादर केला होता. सदर चौकशीत अनेक त्रुटी आढळून आल्या असून, महानगरपालिकेच्या आर्थिक हिताविरुद्ध असल्याने तत्कालीन मनपा आयुक्त लतीश देशमुख, उपायुक्त (कर) राजेंद्र फातले, सहायक आयुक्त (कर) समसुद्दीन शेख उमर व संकीर्ण कर अधीक्षक संजय साबळे यांच्या नावाचा उल्लेख पत्रात आहे. याप्रकरणी शिस्तभंग कारवाई करावी तसेच या दोषी असलेल्यांविरुद्ध दोषारोपासह प्रस्ताव शासनास सादर करण्याचे आदेश दिले आहेत.चौकशी अधिकारी नियुक्तशहरातील किदवाई रस्त्यावरील प्राथमिक शाळेस लागून असलेल्या मनपाच्या मालकीची जागा अहमद नसीम मिना नगरी एज्युकेशनल सोशल अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटीस ११ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याबाबत महासभेत ठराव क्रमांक ५० दि. १८ मे २०१५ रोजी करण्यात आला होता. याविरोधात २८ मे २०१५ रोजी मुस्तकीम डिग्निटी यांनी दाद मागितली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी २३ आॅगस्ट २०१६ रोजी सदर प्रकरणाची चौकशी करणेकामी चौकशी अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी मालेगाव यांची नेमणूक केली होती.चौकशी अधिकारी नियुक्तशहरातील किदवाई रस्त्यावरील प्राथमिक शाळेस लागून असलेल्या मनपाच्या मालकीची जागा अहमद नसीम मिना नगरी एज्युकेशनल सोशल अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटीस ११ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याबाबत महासभेत ठराव क्रमांक ५० दि. १८ मे २०१५ रोजी करण्यात आला होता. याविरोधात २८ मे २०१५ रोजी मुस्तकीम डिग्निटी यांनी दाद मागितली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी २३ आॅगस्ट २०१६ रोजी सदर प्रकरणाची चौकशी करणेकामी चौकशी अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी मालेगाव यांची नेमणूक केली होती.

टॅग्स :MalegaonमालेगांवGovernmentसरकार