शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी वीजबिल वसुलीला मेपर्यंत मुदतवाढीचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 01:00 IST

राज्य सरकारने कृषिविषयक धोरणात शेतकऱ्यांकडील वीजबिल वसुलीसाठी मार्चअखेरपर्यंत मुदत दिली असली तरी, अद्याप शेतकऱ्यांकडे रब्बीचे पैसेच मिळालेले नसल्याने वीजबिल वसुलीसाठी मे २०२१पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, असा ठराव स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला. 

ठळक मुद्देस्थायी समिती बैठक : वीजपुरवठा खंडित न करण्याची सूचना

नाशिक : राज्य सरकारने कृषिविषयक धोरणात शेतकऱ्यांकडील वीजबिल वसुलीसाठी मार्चअखेरपर्यंत मुदत दिली असली तरी, अद्याप शेतकऱ्यांकडे रब्बीचे पैसेच मिळालेले नसल्याने वीजबिल वसुलीसाठी मे २०२१पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, असा ठराव स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात कृषिविषयक वीज धोरणावर चर्चा करण्यात आली. ज्या भागातील ट्रान्सफार्मर दुरुस्त करायचे असेल त्या भागातील शेतकऱ्यांनी किमान थकीत वीजबिलाच्या ८० टक्के रक्कम भरणे क्रमप्राप्त असल्याचे या धोरणात नमूद करण्यात आले आहे. त्याला सदस्यांनी आक्षेप घेतला. शेतकऱ्यांचे रब्बीचे पीक हाता-तोंडाशी आलेले असताना निव्वळ विजेअभावी पिकाला पाणी न देता आल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची भावना डॉ. आत्माराम कुंभार्डे तसेच अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी व्यक्त केली. त्यामुळे शेतकऱ्यांना थकीत बिल भरण्यासाठी मार्च नव्हे तर मे महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करून तसा ठराव शासनाला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी निफाड तालुक्यातील काेल्ड स्टोरेजला पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नसल्याची तक्रार अध्यक्ष क्षीरसागर यांनी केली. त्याबाबतचा प्रस्ताव वीज कंपनीला देण्यात आला असून, त्याचे काय झाले, अशी विचारणाही त्यांनी केली.बसेसअभावी विद्यार्थ्यांचे हालशाळा व महाविद्यालये सुरू करण्यात आली असली तरी, ग्रामीण भागातील बसेस अद्यापही बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून, विद्यार्थ्यांनी गेल्यावर्षी पास काढले आहेत. परंतु त्याची वैधता वाढवून दिली जात नसल्याबद्दल महेंद्रकुमार काले यांनी नाराजी व्यक्त केली. शाळा सरू झाल्याने आता ग्रामीण भागातील बसेस सुरू कराव्यात, असा ठरावही यावेळी करण्यात आला.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदPoliticsराजकारण