शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
3
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
5
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
6
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
7
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
8
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
9
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
10
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
11
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
12
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
14
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
15
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
16
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
17
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
18
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
19
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?

पाणी सोडण्यास सेना आमदारांचा विरोध

By admin | Updated: October 18, 2015 23:29 IST

जनआंदोलन : गंगापूर धरणावर आज ठिय्या

नाशिक : गंगापूर धरणातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात १.३६ टीएमसी पाणी वहन मार्गाने सोडण्यास जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांनी कडाडून विरोध दर्शविला असून, गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध जनआंदोलन उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचीच सुरुवात म्हणून सोमवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता गंगापूर धरणावर शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार अनिल कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.आमदार अनिल कदम आणि आमदार राजाभाऊ वाजे यांनी पत्रकारांशी बोलताना वस्तुस्थिती समोर मांडत सांगितले, महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी व वस्तुस्थिती जाणून न घेता घेतलेला आहे. मुळात गंगापूर धरण ते जायकवाडी हे अंतर २३४ कि.मी. असून, प्रस्तावित १.३६ टीएमसी (३८.३८ एमसीएफटी) पाणी हे वहन मार्गाने जायकवाडीपर्यंत जाऊन पोहोचूच शकणार नाही. वीजपुरवठा खंडित करून हा प्रयत्न यशस्वी होणार नाही शिवाय वहन मार्गाने ८० टक्के पाण्याची गळती होऊन वाया जाणार आहे. २०१२-१३ मध्येही मराठवाड्यातील टंचाईची स्थिती उद्भवली तेव्हा तीन आवर्तने देण्यात आली होती, परंतु पाणी जायकवाडीपर्यंत जाऊन पोहोचू शकले नव्हते. पिण्यासाठी पाणी जरूर द्यायला हवे, परंतु त्यासाठी वहनमार्गाने पाणी सोडणे हा काही उपाय होत नाही.