शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

हस्तांतरणास भाजपातच विरोध

By admin | Updated: June 1, 2017 01:39 IST

नाशिक : त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी या दोन राज्यमार्गांचे हस्तांतरण महापालिकेकडे करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातून जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी या दोन राज्यमार्गांचे हस्तांतरण महापालिकेकडे करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून, सत्ताधारी भाजपातून विरोधाचा सूर उमटू लागला आहे. महापौर रंजना भानसी यांनीही मद्यविक्री दुकानांविरोधात आपली भूमिका स्पष्ट करत शासनाला प्रस्ताव पाठविणार असल्याचे स्पष्ट केले आहे, तर शिवसेनेनेही आक्रमक भूमिका घेत विरोध दर्शविला आहे. शहरातून जाणारा डहाणू-त्र्यंबक-नाशिक हा ८ कि.मी. लांबीचा तसेच नाशिक-दिंडोरी-वणी हा १०.७५० कि.मी. लांबीचा राज्यमार्ग महापालिकेकडे अवर्गीकृत (डिनोटिफाईड) करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे त्र्यंबक मार्गावरील सुमारे २५, तर दिंडोरी मार्गावरील सुमारे नऊ मद्यविक्रीची दुकाने पुन्हा सुरू होणार आहेत. शहरातून जाणाऱ्या राज्यमार्गावरील पाचशे मीटर अंतरावर असलेली मद्यविक्रीची दुकाने वाचविण्यासाठीच राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दोन्ही राज्यमार्ग अवर्गीकृत करण्याची तत्परता दाखविली गेली आहे. शासनाच्या या निर्णयाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपातूनच या निर्णयाला विरोध केला जात आहे. महापौर रंजना भानसी यांनी आपण जनतेसोबत असून, मद्यविक्रीच्या दुकानांना विरोध असल्याचे स्पष्ट केले. महापालिकेचा विरोध असलेला प्रस्तावही शासनाला पाठविला जाणार असून, त्याबाबत शहराध्यक्षांसह पालकमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे महापौरांनी सांगितले. भाजपाचे नगरसेवक व मनपातील सभागृहनेता दिनकर पाटील यांनीही राज्यमार्गांच्या अवर्गीकृत प्रकरणात विरोध दर्शविला. सातपूर विभागातील आठ नगरसेवकांनी यापूर्वीच राज्यमार्ग महापालिकेकडे अवर्गीकृत करण्यास विरोध केलेला असून, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. याबाबत पुन्हा एकदा आयुक्तांसह महापौरांची भेट घेऊन निवेदन दिले जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. निर्णयाविरोधी शिवसेनेने सुद्धा आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेचे महानगरप्रमुख व मनपातील विरोधीपक्षनेता अजय बोरस्ते यांनी सांगितले, शासनाने परस्पर घेतलेला हा निर्णय धक्कादायक आहे. केवळ दारू दुकानदारांचे हित डोळ्यासमोर ठेवत सरकारने हा निर्णय घेण्याची तत्परता दाखविली आहे. मुख्यमंत्र्यांकडून दत्तक घेतलेल्या नाशिकला भरघोस निधी मिळेल अशी अपेक्षा होती परंतु मद्यविक्रेते आणि तळीरामांची बाजू घेत कोट्यवधींचा खर्च मनपाच्या पदरात टाकण्याचे काम त्यांनी केले आहे. महापालिका आयुक्तांची याप्रश्नी भेट घेऊन चर्चा करणार असून, जळगाव महापालिका आयुक्तांनी घेतलेली भूमिका नाशिकच्या आयुक्तांनीही घ्यावी, अशी विनंती करणार आहोत. शासनाने सदरचा निर्णय त्वरित मागे न घेतल्यास शिवसेना स्टाइलने उत्तर देण्याचा इशाराही बोरस्ते यांनी दिला आहे.