शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

संवेदनशील निर्णयांना विरोध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:18 IST

देशात लैंगिक शिक्षण, व्यभिचार, मांस निर्यातसह इतर संवेदनशील विषयांवर झालेले निर्णय घातक ठरत आहे. त्याचा सर्वांनी विरोध करायला हवा. नाहीतर याचे परिणाम युवा पिढीवर होणार आहे. त्यामुळे आपण संसदीय पातळीवर यावर विचारणा केली आहे व यासह इतर निर्णयांवर पुनर्विचार व्हावा अशी मागणी येथील वासुपूज्य राजस्थान जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघमध्ये समाजाचे पद्भुषण प. पूज्य आचार्य देव श्रीमद् विजयरत्न सुंदर सुरीश्वर महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली.

ठळक मुद्देसुंदर सुरीश्वर महाराज : पत्रकार परिषदेत प्रतिपादन

मालेगाव कॅम्प : देशात लैंगिक शिक्षण, व्यभिचार, मांस निर्यातसह इतर संवेदनशील विषयांवर झालेले निर्णय घातक ठरत आहे. त्याचा सर्वांनी विरोध करायला हवा. नाहीतर याचे परिणाम युवा पिढीवर होणार आहे. त्यामुळे आपण संसदीय पातळीवर यावर विचारणा केली आहे व यासह इतर निर्णयांवर पुनर्विचार व्हावा अशी मागणी येथील वासुपूज्य राजस्थान जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघमध्ये समाजाचे पद्भुषण प. पूज्य आचार्य देव श्रीमद् विजयरत्न सुंदर सुरीश्वर महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली.मालेगाव संघातर्फे महाराजांचा प्रवेश सोहळा शहरात पार पडला. तीन दिवस महाराजांचे प्रवचन, इतर धार्मिक विधी, मार्गदर्शन सुरू आहे. सुंदर सुरीश्वर महाराज म्हणाले, सध्या देशाला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यात वरिष्ठ काही प्रश्नांमुळे युवा पिढीपुढे समस्या येऊ शकतात. लैंगिक शिक्षणांमुळे बालमनावर परिणाम होतील ही पिढी बरबाद होऊ शकते तर व्यभिचार हा कायदेशीर ठरवला गेला ही गंभीर बाब आहे. तसेच सध्या भ्रमणध्वनीवर तरुणांसह असंख्य वेबसीरिज पाहण्यात मग्न झाली आहे. या सिरीज, अश्लील संकेतस्थळ बंद होण्यासाठी राज्यसभेत आपण याचिका दाखल केली आहे. तर यापूर्वी कॉँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या याबाबत भेटी घेतल्या आहे. आपला देश संस्कार व संस्कृतीवर पुढे जात आहे याचे भान ठेवावे. तर पैशांच्या हव्यास वाढलेला आहे. सहज, झटपट व कशाही पद्धतीने पैसा मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहे. आपण शासनाला मात्र निर्यातसह इतर दहा विषयांवरील अनुदानास विरोध केला आहे. आमच्या प्रयत्नामुळे अनेक मुक्या जनावरांचे प्राण वाचले आहे. पत्रकार परिषदेस प. पू. महाराजासह जैन संघाचे दीपक मेहता, शीतल संघवी, वस्तुपाल मेहता, सुरेश कुचेरिया, मनिष सोलंकी, कुणाल शहा, ईशान जैन, आशिष जैन, पंकज कोठारी, राकेश जैन आदी उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिक