शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावित मलनिस्सारण केंद्रास विरोध

By admin | Updated: September 5, 2015 22:24 IST

प्रस्तावित मलनिस्सारण केंद्रास विरोध

सिडको : येथील खुटवडनगर, कामटवाडे भागालगत नव्याने होऊ घातलेल्या मलनिस्सारण (एसटीपी) केंद्रास परिसरातील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. दरम्यान, याबाबत मनपा प्रशासनाने विचार न केल्यास यापुढील काळात सर्व नागरिक एकत्रित येऊन जनआंदोलन करण्याच्या तयारीत आहे. सातपूर शिवारातील (सर्व्हे नं. ११० ते ११८ ) व कामटवाडा खुटवडनगर भागालगत नव्याने विकसित होत असलेल्या ठिकाणी मनपाच्या वतीने मलनिस्सारण केंद्र उभारण्याची तयारी केली आहे; परंतु या ठिकाणी होऊ घातलेल्या मलनिस्सारण केंद्राच्या लगतच काही अंतरावर शाळा, शासकीय कार्यालये, मंगल कार्यालये, छोटे-मोठी दुकाने आहेत. भविष्यात या मलनिस्सारण केंद्रामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्र्माण होऊ शकतो. यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागणार आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया, विषारी जिवाणू, अळ्या आदिंचा प्रादुर्भाव वाढू शकतो. तसेच मलनिस्सारण केंद्रात मशिनरींचा सततचा आवाजामुळे होणारे ध्वनी प्रदूषणाने परिसरातील शांतता भंग होऊ शकते. तरी मनपा प्रशासनाने याबाबत फेरविचार करावा अन्यथा या पुढील काळात जनआंदोलन करण्याचा इशारा हरीश जोशी, विलास पाटील, अनिल आव्हाड, निवृत्ती कोकाटे, सुभाष दत्ता, नाना भोळे, श्रीराम गोरे, अशोक वाडिले, यशवंत पैडलीस्कर, सुरेंद्र पंडित यांसह परिसरातील नागरिकांनी दिला आहे.