शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

उरलेल्या मंडपाचा विक्रेत्यांना आसरा

By admin | Updated: September 23, 2015 22:52 IST

उरलेल्या मंडपाचा विक्रेत्यांना आसरा

नाशिक : साधुग्राममध्ये जवळपास निम्म्यापेक्षा जास्त खालशे साहित्य घेऊन रवाना झाले आहेत. काही खालशांमध्ये मंडप, इतर सामान आवरासावर सुरू आहे; मात्र ५० ते ६० खालशे त्र्यंबकच्या शाहीस्नानानंतर जाणार आहेत. त्यामुळे उरलेल्या या खालशातील मंडपाचा साधू, विक्रेत्यांना आसरा झाला आहे. साधुग्राम तिसऱ्या शाही पर्वणीनंतर रिकामे होण्यास सुरुवात झाली; मात्र याठिकाणी रस्त्यावर विविध वस्तू विकणारे किरकोळ विक्रेते उदरनिर्वाहासाठी थांबले आहेत. आखाडे, खालशे गेल्याने इतर ठिकाणच्या रस्त्यावर भाविकांची गर्दी होत नसल्याने वस्तंूची विक्री होत नसल्याने त्यांनी कपिला संगमाजवळ ठाण मांडले आहे. कपिला संगमाजवळ कायम गर्दीचा ओघ असल्याचे वस्तूची विक्री चांगली होत असल्याचे सदर विक्रेत्यांनी सांगितले. सध्या मोजक्याच खालशांचा मुक्काम काही दिवस वाढल्याने त्याठिकाणच्या मंडपात थांबलेल्या साधू व विक्रेत्यांचे वास्तव्य दिसून येत आहे. पर्वणी काळात साधुग्राममध्ये विविध ंिठकाणी अन्नछत्रे मोठ्या प्रमाणात सुरू होती. त्यामुळे किरकोळ विक्रेते अन्नछत्रात भोजनाचा लाभ घेत होते. तसेच रस्त्यावर विविध वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांनी साधुग्राममधील महापालिकेने उभारलेल्या खालशाच्या स्नानगृहात संसार मांडला आहे. खालशातील साधू रवाना झाल्यानंतर स्नानगृह व शौचालयाची शाही सुविधा या विक्रेत्यांना उपलब्ध झाली आहे. खालशाच्या स्नानगृहात स्वयंपाक करून त्याठिकाणीही त्यांचे वास्तव्य दिसून येत आहे. पावसामुळे स्नानगृहाच्या पत्र्यांच्या शेडचा निवासासाठी या विक्रेत्यांनी वापर केला आहे. साधुग्राममध्ये थांबायचे तोपर्यंत पावसापासून बचावासाठी हा पर्याय निवडल्याचे साहित्य विक्रेत्यांनी सांगितले. साधुग्राममध्ये खालशामध्ये मुक्कामी थांबलेल्यांच्या समस्या वाढल्या आहेत. खालशामध्ये चाऱ्या काढण्यात आल्या नसल्याने पावसाचे पाणी शिरत आहे. त्यामुळे याठिकाणी साधूंच्या निवासासह भोजन तयार करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुक्कामी थांबलेल्या खालशातील सेवा, सुविधांकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)