शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयातच धसास लागेल : उज्ज्वल निकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 01:13 IST

सर्व कायदेशीर बाजूंचा अभ्यास करूनच मराठा आरक्षणासाठी पुढे पाऊल टाकावे लागणार असून, मराठा आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयातच धसास लागू शक तो, असे प्र्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ तथा विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी केले आहे.

नाशिक : सर्व कायदेशीर बाजूंचा अभ्यास करूनच मराठा आरक्षणासाठी पुढे पाऊल टाकावे लागणार असून, मराठा आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयातच धसास लागू शक तो, असे प्र्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ तथा विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी केले आहे.  नाशिक येथील संदीप फाउण्डेशनमध्ये शैक्षणिक कार्यक्रमासाठी आलेले असताना ते शुक्रवारी (दि. २७) पत्रकारांशी बोलत होते. निकम म्हणाले, आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे याविषयी तत्काळ कोणताही निर्णय होणे शक्य नाही. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करणे गरजेची आहे. दगडफेक व हिंसाचार कोणत्याही प्रश्नांचे उत्तर होऊ शकत नाही. हिंसाचारामुळे गरिबांनाच त्रास होतो. राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान म्हणजे आपले स्वत:चे नुकसान करण्यासारखे असल्याचे सांगतानाच तरुणांनी सामंज्यस्याची भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. रोजगार मिळत नसल्याने आरक्षणासारखे प्रश्न निर्माण होत आहे. अशा प्रश्नावर रोजगाराभिमुख शिक्षण देणे हा पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.   शिक्षण हा विकासाचा पाया आहे. शिक्षणामुळे जात, धर्म, भाषेच्या पलीकडे १जाऊन देशाची प्रगती साधने शक्य असून, त्यासाठी शिक्षण क्षेत्रात कार्यरत धुरिणांनी तसेच संस्थांनी रोजगाराभिमुख शिक्षण देतानाच स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.सोशल मीडिया दुधारी तलवारसोशल मीडिया म्हणजे दुधारी तलवार आहे. या माध्यमाचा जनसंपर्कासाठी आणि संवादासाठी जेवढा चांगला वापर होऊ शकतो, त्याचप्रमाणे अपप्रचार, फेक न्यूज आणि समाजात द्वेश पसरविण्यासारख्या विकृ त कृत्यांसाठीही होतो. परंतु, सोशल मीडियाच्या दुष्परिणांमांचा त्रास केवळ सामान्य माणसांनाच सहन करावा लागतो. त्यामुळे लोकशाही प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याचा अधिकार असला तरी सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून वागण्याची गरज आहे. सामान्य माणसाने कोणत्याही प्रकारच्या चिथावणी आणि प्रलोभनांना बळी न पडता स्वत:च्या विचारानुसार कृती करण्याचे आवाहन अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी केले आहे. 

टॅग्स :Ujjwal Nikamउज्ज्वल निकम