शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी तालुक्यातील १७ ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 00:47 IST

दिंडोरी : तालुक्यातील १२१ ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित क्षेत्राबाहेरील १७ ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षण सोडत तहसीलदार पंकज पवार यांचे अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात पार पडली.

ठळक मुद्देसन १९९५ पासूनचा आरक्षणाचा विचार करता आरक्षण काढण्यात आले.

दिंडोरी : तालुक्यातील १२१ ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित क्षेत्राबाहेरील १७ ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षण सोडत तहसीलदार पंकज पवार यांचे अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात पार पडली.सन १९९५ पासूनचा आरक्षणाचा विचार करता आरक्षण काढण्यात आले. १७ पैकी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी प्रत्येकी एक, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी पाच जागा आरक्षित करण्यात आल्या. उर्वरित दहा ठिकाणी सरपंचपद खुले असणार आहे. त्यात महिलांसाठीचे आरक्षण ३ फेब्रुवारीला होणार आहे.

 उतरत्या लोकसंख्या क्रमानुसार व यापूर्वी आरक्षण नसलेल्या ग्रामपंचायतींचे आरक्षण त्यानुसार निश्चित करण्यात आले. एक नागरिकांचे मागास प्रवर्गासाठी अजय गवारे या बालकाचे हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. त्यात परमोरीची चिठ्ठी निघाली.

यावेळी गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार,बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील,उपसभापती अनिल देशमुख, जि.प. सदस्य भास्कर भगरे,अवनखेड सरपंच नरेंद्र जाधव, ओझरखेड सरपंच गंगाधर निखाडे,बोपेगाव सरपंच वसंत कावळे,लोखंडेवाडी सरपंच संदीप उगले काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड जवळके उपसरपंच योगेश दवंगे,भाजप नेते योगेश बर्डे,विनायक शिंदे,अनंत पाटील आदींसह सर्व गावांतील नवनिर्वाचित सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.

अनुसूचित क्षेत्रासह सर्व ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिला राखीव आरक्षण ३ फेब्रुवारीला होणार आहे. आरक्षण सोडत होताच सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. 

दिंडोरी सरपंचपद आरक्षण पुढीलप्रमाणेअवनखेड : अनुसूचित जाती, मातेरेवाडी :अनुसूचित जमाती, म्हेळुस्के : नागरिकांचा मागास प्रवर्ग, शिंदवड : नागरिकांचा मागास प्रवर्ग, ओझरखेड : नागरिकांचा मागास प्रवर्ग, सोनजांब : नागरिकांचा मागास प्रवर्ग, परमोरी : नागरिकांचा मागास प्रवर्ग,सर्वसाधारण : खेडगाव, बोपेगाव, वलखेड, पाडे, लोखंडेवाडी, लखमापूर, जवळके वणी, तळेगाव वणी, तिसगाव , आंबेवणी 

टॅग्स :reservationआरक्षणgram panchayatग्राम पंचायत