शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यातील 15 पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 16:33 IST

पंचायत समित्यांच्या सभापतींना शासनाने दिलेली अडीच वर्षांची मुदत संपुष्टात आल्यामुळे नवीन सभापतींच्या निवडीसाठी पंचायत समित्यांचे आरक्षण काढण्यास शासनाने मान्यता दिल्यांनंतर शनिवारी (दि. २१) जिल्हाधिकारी कार्यालयात सोडतीद्वारे आरक्षण काढण्यात आले.

ठळक मुद्देपंचायत समिती सभापती पदासाठी सोडतनाशिक जिल्ह्यातील 15 जागांसाठी सोडत अनुसुचित जमाती महिलांसाठी पाच जागांवर आरक्षण

नाशिक : पंचायत समित्यांच्या सभापतींना शासनाने दिलेली अडीच वर्षांची मुदत संपुष्टात आल्यामुळे नवीन सभापतींच्या निवडीसाठी पंचायत समित्यांचे आरक्षण काढण्यास शासनाने मान्यता दिल्यांनंतर शनिवारी (दि. २१) जिल्हाधिकारी कार्यालयात सोडतीद्वारे आरक्षण काढण्यात आले.  यात पाच पंचायत समित्यांमध्ये अनुसुचीत जमाती महिला प्रवर्गासाठी, चार पंचायत समित्यांसाठी अनुसुचित जमाती प्रवर्ग, तर दोन ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग, दोन ठिकाणी नागरिकांचा मगासप्रवर्ग (महिला), एक सर्वसाधारण (महिला ) व एक अनुसुचित जातीसाठी आरक्षण निघाले आहे. तर पंधरापैकी एकाही पंचायसमितीमध्ये सर्वसाधारण गटासाठी आरक्षण न सुटल्याने सर्वलाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण निघाले नाही, त्यामुळे या गटातील पुरुष दावेदारांना आता आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड दि. १४ फेब्रुवारी २०१७ रोजी करण्यात आली होती. त्यांची मुदत संपुष्टात येण्यापूर्वीच तत्कालीन राज्य सरकारने जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व पंचायत समित्यांच्या सभापतींना चार महिन्यांची मुदतवाढ दिली होती. पंचायत समित्यांची मुदत आठ दिवसांपूर्वी संपुष्टात आली असून, या संदर्भात शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा होती. मात्र तीन ते चार दिवसांपूर्वीच शासनाने जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व पंचायत समित्यांना आणखी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. त्याचबरोबर पंचायत समित्यांचे आरक्षण काढण्याचा कार्यक्रमही जाहीर केला. त्यानुसार शनिवारी सोडतीद्वारे सभापतींचे आरक्षण काढण्यात आले. यात नाशिक जिल्ह्यातील पंधरा पंचायत समित्यांपैकी निफाड पंचायतसमितीसाठी सर्वसाधारण (महिला) प्रवर्गाचे आरक्षण निघाले असून मालेगाव व नांदगावमध्ये नागरिकांचा मागास प्रर्व, सिन्नर व नाशिकसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला),दिंडोरी ,कळवण, बागलाण, सुरगाणा,येवला याठिकाणी अनुसूचित जमाती (महिला), इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, देवळा-अनुसूचित जमाती व चांदवड पंचायत समितीतसाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षणाची सोडत निघाली आहे.   दरम्यान, जिल्ह्यातील अनुसुचित क्षेत्राबाहेर असलेल्या ८ पैकी केवळ निफाड या एकच पंचायत समीतीसाठी सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी संधी मिळाली आहे,तर सर्वसाधारण खुल्या  प्रवर्गासाठी एकही जागेवर संधी मिळालेली नाही. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील इच्छुक सदस्यांना सभापतीपदासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.  असे आहे आरक्षणसर्वसाधारण (महिला )-निफाड,नागरिकांचा मागास प्रवर्ग(ओबीसी)- मालेगाव,नांदगाव.नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी महिला)- सिन्नर, नाशिक अनुसूचित जमाती(एस टी महिला)- दिंडोरी ,कळवण, बागलाण ,सुरगाणा ,येवला .अनुसूचित जमाती(एस टी)- इगतपुरी,त्र्यंबकेश्वर,पेठ, देवळा.अनुसूचित जाती(एस सी)-चांदवड    

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकElectionनिवडणूकpanchayat samitiपंचायत समिती