नाशिक : जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीनंतर खदखदत असलेली राष्ट्रवादीतीलअंतर्गत नाराजी समिती वाटप व सदस्य निवडीच्या विशेष बैठकीतून बाहेर येताच त्याची तातडीने दखल माजी पालकमंत्री व आमदार छगन भुजबळ यांनी घेतल्याचे वृत्त असून, यासंदर्भात महत्त्वाची बैठक शुक्रवारी (दि.७) दुपारी भुजबळ फॉर्मवर बोलविण्यात आल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीत राष्ट्रवादीचे सदस्य सोडून अपक्ष सदस्य विजयश्री चुंबळे यांची निवड केल्यानंतर राष्ट्रवादीतील सदस्यांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत होता. माजी आमदार दिलीप बनकर यांनी त्यांच्या पत्नी मंदाकिनी बनकर यांची अध्यक्षपदी निवड न झाल्याने नाराजी व्यक्त करीत थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली होती.
राष्ट्रवादीतील नाराजीची भुजबळांकडून दखल फेरबदल
By admin | Updated: November 7, 2014 00:38 IST