शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
3
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
4
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
5
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
6
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
7
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
8
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
9
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
10
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
11
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
12
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
13
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
14
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
15
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
16
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत
17
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
18
पाकिस्तानात भिकाऱ्यांकडे बंगला, स्विमिंग पूल अन् SUV कार...; कसा चालतो हा व्यापार?
19
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदीपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
20
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट

माजी आयुक्तांवर शरसंधान

By admin | Updated: July 21, 2016 01:23 IST

महापालिका महासभा : ‘एलईडी’ प्रकरणी महापौरांनी दिले सखोल चौकशीचे आदेश

 नाशिक : वादग्रस्त ठरलेल्या ‘एलईडी’ ठेकाप्रकरणी सदस्यांनी तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांच्यावर शरसंधान साधत त्यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. केवळ निवृत्त उपअभियंताच नव्हे तर या प्रकरणात सहभागी असलेल्या आयुक्तांपासून सर्वांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली. सभागृहाचा कल लक्षात घेऊन यावेळी महापौर अशोक मुर्तडक यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी काही धक्कादायक बाबींकडे लक्ष वेधल्याने ‘एलईडी’ प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शहरात अस्तित्वात असलेले पथदीप काढून बीओटी तत्त्वावर एलईडी फिटिंग बसविण्याच्या कामात झालेल्या अनियमिततेबद्दल तत्कालीन उपअभियंता नारायण गोपाळराव आगरकर यांची विभागीय चौकशी करण्यासंबंधीचा प्रस्ताव बुधवारी महासभेत मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. त्याअनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्यांनी वादग्रस्त एलईडीबाबत सखोल चौकशीची मागणी लावून धरली. अपक्ष गटनेते संजय चव्हाण यांनी याप्रकरणी चौकशी करण्याची सूचना करतानाच तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांच्याकडून झालेल्या चुकीच्या कामकाजाबद्दलही आक्षेप नोंदविले. सदर प्रकरणाच्या करारनाम्याला मान्यता देणाऱ्या तत्कालीन स्थायी समितीलाही दोषी धरण्याची मागणी चव्हाण यांनी केली. यावेळी दिनकर पाटील यांनी आपण स्थायीवर सदस्य असताना त्यावेळी विरोधाची भूमिका घेतली असल्याचे निदर्शनास आणून दिले. माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी तांत्रिक अहवालाचा विचार न करता चुकीच्या पद्धतीने निविदाप्रक्रिया राबविली गेल्याचा आरोप केला. तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांनी भावनेच्या आहारी जाऊन काही लोकांवर पदांची खैरातही केल्याचे बडगुजर यांनी सांगितले. उच्च न्यायालयातही खंदारे यांनी स्वार्थापोटी चुकीची माहिती दिली. या प्रकरणात महापालिकेचे १५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगत बडगुजर यांनी चौकशी करायचीच तर ती आगरकरांबरोबरच आयुक्त, लेखापाल, लेखापरीक्षक या सर्वांची करा, अशी भूमिका घेतली. उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनात एलईडीप्रकरणी काही धक्कादायक बाबी सभागृहासमोर ठेवल्या. १३१ कोटी रुपयांचे निविदा मूल्य असताना त्याच्या तीन टक्के सुमारे ३ कोटी ९० लाखाची सुरक्षा अनामत कंत्राटदाराकडून घेणे आवश्यक होते. परंतु नियमाचे उल्लंघन करत सुरक्षा अनामत न घेता करारनामा करण्यात आला.