शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जलद विकासासाठी अभियांत्रिकी दृष्टिकोन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:11 IST

: भारताची वैश्विक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असताना राष्ट्रीय विकास जलदगतीने साधणे आवश्यक असून, त्यासाठी वैज्ञानिक व अभियांत्रिकी दृष्टिकोनातून विकास योजना आखण्याची गरज असल्याचे प्र्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले.

नाशिक : भारताची वैश्विक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असताना राष्ट्रीय विकास जलदगतीने साधणे आवश्यक असून, त्यासाठी वैज्ञानिक व अभियांत्रिकी दृष्टिकोनातून विकास योजना आखण्याची गरज असल्याचे प्र्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले. उंटवाडी परिसरातील दि इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्सच्या सभागृहात अभियंता दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष मनीष कोठारी, सचिव सुमित खिंवसरा, सहसचिव विपुल मेहता, अजित पाटील उपस्थित होते. हेमंत गोडसे म्हणाले की, देशातील शिक्षण, आरोग्य, कृषी, उद्योग- व्यवसाय व दळणवळण क्षेत्रात झपाट्याने विकास साधण्यासाठी वैज्ञानिक व अभियांत्रिकी दृष्टिकोनातून विकास योजना आखण्याची गरज आहे. नाशिक जिल्ह्यात इस्त्रोच्या सहकार्यातून अशाप्र्रकारे योजना आखण्यास सुरुवात झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, अभियंता दिनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्तर महाराष्ट्रातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील पदवी आणि पदव्युत्तर पदवीत अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांना सत्कार करून सन्मानित करण्यात आले.  यावेळी महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्यासह संजय लोंढे, संतोष मुथा, नरेंद्र बिरार, महावीर चोपडा, विलास पाटील, पी. के. पवार, अपूर्वा जाखडी, नॉर्बर्ट डिसूझा, संजय देशपांडे, नयनीश जोशी आदी उपस्थित होते. मनीष कोठारी यांनी प्रास्तावित केले. अजित पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सुमित खिंवसरा यांनी आभार मानले.सत्कारार्थी विद्यार्थीइंजिनिअरिंगच्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये जळगाव येथील जीएच रायसोनी महाविद्यालयाच्या संजय महाजनसह नाशिक येथील गुरु गोविंदसिंगचा प्रणीत चौधरी, के. के वाघचा गोविंद भावसार, सोहम गायधनी, लोकनेते गोपीनाथ मुंडेतील शुभांगी भुसारे, मतोश्रीची शीतल कहांडळ व प्रतीक्षा देवकर, मेटची श्वेता धोंडगे व सोनाली भंडारे, केबीटीची चंचल जावळे, पुणे विद्यार्थिगृहाचा गणेश शेटे व शीतल बोरसे, शिरपूरच्या आर.सी पटेलमधील स्नेहा हंसवानी व दिव्या वानखेडे, संदीप इन्स्टिट्यूटची ऐश्वर्या बरड व चांदवडच्या के. बी. जैनमधील निखिता चव्हाण व नोहसिन कुरेशी, एसएसबीटीची गायत्री बडगुजर, जवाहर एज्युकेशन इन्स्टिट्यूटची स्नेहल गुळवे या पदवीधर विद्यार्थ्यांसह के. के. वाघच्या एमई करणाºया मयूर जैन व रशिदा बादलीवाला या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.