जळगाव नेऊर : ग्रामपंचायत सरपंच सेवा संघ ह्या मान्यताप्राप्त संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २१ कलमी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी सदर मागण्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सरपंचांच्या शिष्टमंडळास दिले.शिष्टमंडळात ग्रामपंचायत सरपंच सेवा संघाचे राज्याध्यक्ष पुरु षोत्तम घोगरे, राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे पाटील, मराठवाडा अध्यक्ष माधव गंभीरे, सोपान जोंधळे, भाऊसाहेब कळसकर, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष, रामनाथ बोराडे, चांगदेव जोंधळे, अजय जाधव आणि जयराम मुंढे उपस्थित होते. ग्रामपंचायत सरपंच सेवा संघाच्या मागण्यांमध्ये सरपंच मानधन वाढ, सरपंच आमदार प्रतिनिधी, सरपंच पेन्शन योजना, १४ वा वित्त आयोगाचा किमान २५ लाख निधी मिळणे, आदी विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून सरपंचांच्या विविध मागण्या मान्य झाल्यास ग्रामविकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असल्याचे कळसकर यांनी सांगितले. सरपंच संघाच्या मागण्याकॉम्प्युटर आॅपरेटरची नियुक्ती करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला देण्यात यावेत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सरपंचाची नियुक्ती करण्यात यावी, तहसील मार्फत मिळणारा जमीन व महसूल कर आणि मुद्रांक शुल्क ग्रामपंचायतीला ५० टक्के देण्यात यावा, ग्रामपंचायत पथदीप व पाणीपुरवठा बिल जिल्हा परिषदेने सेस फंडातून भरावे, सरपंचांना मानधन दरमहा २५ हजार, उपसरपंचांना दहा हजार तर ग्रामपंचायत सदस्यांना ३ हजार रुपये देण्यात यावेत आदी मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
सरपंच सेवा संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 01:09 IST
जळगाव नेऊर : ग्रामपंचायत सरपंच सेवा संघ ह्या मान्यताप्राप्त संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २१ कलमी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी सदर मागण्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सरपंचांच्या शिष्टमंडळास दिले.
सरपंच सेवा संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
ठळक मुद्दे२१ कलमी मागण्या : प्रश्न सोडविण्याचे शिष्टमंडळास दिले आश्वासन