येथील तहसील कार्यालयात तहसीलदार संदीप भोसले यांचे हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. तत्पूर्वी उपस्थितांनी संविधान वाचन केले. पोलीस व वनरक्षक दलाने ध्वजास मानवंदना दिली. याप्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जि.प. सदस्य भास्कर गावीत, हेमलता गावीत, सभापती विलास अलबाड, नगराध्यक्ष मनोज घोंगे, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे, मुख्याधिकारी लक्ष्मीकांत कहार यांचेसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते. पंचायत समिती कार्यालयात जि.प. सदस्य भास्कर गावीत यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नगरपंचायत, हुतात्मा स्मारक, जनता विद्यालय, दादासाहेब बिडकर महाविद्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सार्वजनिक वाचनालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आदी ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. प्रा. चंद्रशेखर पठाडे यांनी सूत्रसंचलन केले.
-----------------------
पेठ येथील तहसील कार्यालय आवारात ध्वजारोहण करताना तहसीलदार संदीप भोसले, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, भास्कर गावीत, विलास अलबाड आदी. (२७ पेठ २)
===Photopath===
270121\27nsk_8_27012021_13.jpg
===Caption===
२७ पेठ २