शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेस पक्षाच्या बैठकीत स्थानिक नेत्यांची खरडपट्टी

By admin | Updated: January 29, 2017 00:29 IST

अपुरी तयारी: मनसेशी पॅनल करण्यावरूनही नाराजी

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील आघाडीची बैठक जितेंद्र आव्हाड यांच्या सोलापूर दौऱ्यामुळे होऊ शकलेली नाही. ती आता रविवारी (दि.२९) ठाणे येथे होणार आहे. तथापि, काँग्रेस अंतर्गतच गोंधळाचे वातावरण असून, आधी पूर्वतयारी न करताच कोणत्याही जागांवर दावे ठोकण्याच्या प्रकारावरून श्रेष्ठींनी शुक्रवारी मुंबईत चांगलीच खरडपट्टी काढल्याचे वृत्त आहे. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेने कंबर कसली असून, त्या तुलनेत कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था फारशी चांगली आहे. त्यामुळे आघाडीशिवाय पर्याय नाही अशा स्थितीत काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडे मागणी करण्यासाठी ज्या प्रभागांविषयी शुक्रवारी मुंबईत चर्चा झाली, त्यात काही ठिकाणी कॉँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही त्यामुळे अशा ठिकाणी कशाला जागा मागतात? असा प्रश्न करण्यात आला. विशेष म्हणजे दोन प्रभागांत कॉँग्रेसचा एक किंवा दोन उमेदवार आणि पुन्हा तडजोड करण्यासाठी मनसे तसेच अपक्षांशी युती करण्याचा प्रस्ताव असल्याने त्याविषयीदेखील श्रेष्ठींनी नाराजी व्यक्त केली. कुठे मनसेची आघाडी, तर कुठे अपक्षांबरोबर आघाडी हा काय प्रकार आहे. प्रत्येक प्रभागानिहाय वेगवेगळ्या पक्षांशी आघाडी करायची काय? असा प्रश्न करण्यात आल्याचे समजते. महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे श्रेष्ठी मेहनत घेत असताना स्थानिक पातळीवर कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी व्यवस्थित झालेली नसल्याने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. कॉँग्रेस पक्षाची ज्याला साथ हवी त्यांनी थेट कॉँग्रेस पक्षात प्रवेश करावा आणि पक्षचिन्हावर निवडणूक लढवावी, असेही मत त्यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. त्यातच निष्ठावानांच्या गटातूनही अगोदरच उमेदवारीसाठी व्यूहरचना सुरू असल्याने त्याचे बैठकीत पडसाद उमटल्याचे समजते. प्रभाग १३ मधील सेवादल कार्यकर्त्या महिलेस उमेदवारी मिळावी म्हणून सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष मदन दायमा यांनी आग्रह धरला. तेथे अगोदरच कॉँग्रेस, मनसे आणि अपक्ष युतीचा प्रस्ताव होता. त्यामुळे श्रेष्ठींनी त्याविषयीही विचारणा करण्यात केल्याचे कळते. (प्रतिनिधी)