शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारांच्या संपामुळे फेरनिविदांची नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:05 IST

केंद्र व राज्य सरकारने वस्तू व सेवा कर लागू केल्याने शासकीय कंत्राटातील रस्ते, पूल, धरण, मोºया, इमारत आदी कामांवरही १८ टक्के जीएसटी लागू झाल्यामुळे ठेकेदार हवालिदल झाले आहेत. त्यामुळे कळवण विभागातील रस्ते दुरु स्तीच्या कामांच्या निविदांवर ठेकेदारांनी बहीष्कार टाकल्यामुळे फेरनिविदा काढण्याची नामुष्की शासनावर ओढावली आहे. परंतू या रस्त्याच्या दुरु स्ती कामांच्या निविदा न भरण्याच्या निर्णयावर कळवण विभागातील ठेकेदार ठाम असल्याने फेरनिविदा पुन्हा संकटात सापडण्याची चिन्हे असून राज्यात व जिल्ह्यात अशीच परिस्थिती असल्याने विकासकामे ठप्प झाली आहेत.

कळवण : केंद्र व राज्य सरकारने वस्तू व सेवा कर लागू केल्याने शासकीय कंत्राटातील रस्ते, पूल, धरण, मोºया, इमारत आदी कामांवरही १८ टक्के जीएसटी लागू झाल्यामुळे ठेकेदार हवालिदल झाले आहेत. त्यामुळे कळवण विभागातील रस्ते दुरु स्तीच्या कामांच्या निविदांवर ठेकेदारांनी बहीष्कार टाकल्यामुळे फेरनिविदा काढण्याची नामुष्की शासनावर ओढावली आहे. परंतू या रस्त्याच्या दुरु स्ती कामांच्या निविदा न भरण्याच्या निर्णयावर कळवण विभागातील ठेकेदार ठाम असल्याने फेरनिविदा पुन्हा संकटात सापडण्याची चिन्हे असून राज्यात व जिल्ह्यात अशीच परिस्थिती असल्याने विकासकामे ठप्प झाली आहेत. सध्या सुरू असलेल्या शासकीय ठेकेदारीच्या कामासह नवीन निविदांवरही शासनाने १८ टक्के जीएसटी लागू केल्याने त्यांचा मोठा भुर्दड ठेकेदारांना बसणार आहे. त्यामुळे ठेकेदार व बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडिया ही संघटना आक्र मक झाली असून सकारात्मक निर्णय होत नसल्याने सर्व शासकीय कामे ठप्प झाली आहेत. नवीन निविदांवरही बिहष्कार टाकण्याचा निर्णय ठेकेदारांनी व संघटनेने घेतला आहे.  यापुढे शासकीय कामांच्या ज्या निविदा निघतील त्यावर १८ टक्के जीएसटी लागणार आहे. त्यामुळे निविदांचे दर जीएसटीसह असावे अशी मागणी ठेकेदार व बिल्डर्स संघटनेची आहे. तसे न झाल्यास नवीन निविदांवर लागणारा जीएसटी कंत्राटदारांना भरावा लागणार आहे. त्यामुळे या नवीन निविदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडिया मालेगाव सेंटरचे अध्यक्ष धिरेन पगार यांनी सांगितले. बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडीया मालेगाव सेंटर यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, अर्थमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, जलसंपदा मंत्री, प्रधान सचिव (बांधकाम), प्रधान सचिव (वित्त), प्रधान सचिव (जलसंपदा) यांना दिले. मात्र काहीही उपाययोजना न झाल्याने सर्व ठेकेदारांनी प्रगतीत असलेली विकास कामे बंद केली आहेत.बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडिया नाशिक सेंटर यांनी हॉटमिक्स रोड कॉन्ट्रक्टर असोसिएशन, सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना व मजूर बांधकाम सहकारी संघटना यांची राज्यस्तरीय बैठक २५ सप्टेंबर सोमवार रोजी सोमेश्वर लॉन्स, गंगापूररोड, नाशिक येथे आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये १९ सप्टेंबरचा जी. आर. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर शासकीय खाते संबंधित अडचणींबाबत चर्चा होणार आहे. तसेच आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.