शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सेना-रिपाइं गटनोंदणी प्रस्ताव फेटाळला

By admin | Updated: March 28, 2017 00:53 IST

नाशिक : शिवसेनेने यापूर्वीच गटनोंदणी केलेली असल्याने रिपाइंसोबत गटनोंदणीची पुनरुक्ती करता येणार नसल्याचा निर्णय विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिला.

नाशिक : शिवसेनेने यापूर्वीच गटनोंदणी केलेली असल्याने रिपाइंसोबत गटनोंदणीची पुनरुक्ती करता येणार नसल्याचा निर्णय विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिल्याने महापालिकेच्या स्थायी समितीवर भाजपाचा सभापतिपद विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेनेने विभागीय आयुक्तांच्या या निर्णयाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करत उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.महापालिकेत भाजपा- ६६, शिवसेना- ३५, कॉँग्रेस- ६, राष्ट्रवादी- ६, मनसे- ५, अपक्ष- ३ आणि रिपाइं- १ असे पक्षीय बलाबल आहे. त्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेसोबत प्रत्येकी एक अपक्ष जात एकत्रित गटनोंदणी केलेली आहे, तर रिपाइंने शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेत एकत्रित गटनोंदणी करण्याचा अर्ज विभागीय आयुक्तांकडे १४ मार्च रोजी सादर केला होता. मात्र, शिवसेनेने अगोदरच स्वतंत्र ३५ सदस्यांची गटनोंदणी केलेली असल्याने पुन्हा रिपाइंसोबत गटनोंदणीची पुनरुक्ती करता येणार नाही, असा निर्णय देणारे पत्र विभागीय आयुक्तांनी शिवसेना गटनेता विलास शिंदे यांना सोमवारी (दि.२७) दिले आहे.  विभागीय आयुक्तांनी सेना-रिपाइंचा एकत्रित गटनोंदणीचा प्रस्ताव फेटाळून लावल्याने तौलनिक संख्याबळात आता सेनेचे ३५ सदस्यच मोजले जातील. सेना-रिपाइंची एकत्रित गटनोंदणी झाली असती तर स्थायी समितीवर भाजपा- ८, शिवसेना- ५, कॉँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे यांचे प्रत्येकी एक सदस्य नियुक्त होऊ शकले असते आणि स्थायीवर ८-८ संख्याबळ होऊन चिठ्ठी पद्धतीने सभापतिपदाची निवड करावी लागली असती. परंतु, विभागीय आयुक्तांनी एकत्रित गटनोंदणीचा प्रस्ताव फेटाळून लावल्याने आता स्थायीवर भाजपा- ९, शिवसेना- ४, कॉँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे यांचे प्रत्येकी एक याप्रमाणे सदस्य नियुक्त होणार आहेत. परिणामी, स्थायीवर भाजपाचे स्पष्ट बहुमत होऊन सभापती निवडला जाणार आहे. (प्रतिनिधी)प्रत मात्र आघाडीच्या नावानेविभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिलेल्या निर्णयाच्या प्रतीवर दि. २४ मार्च ही तारीख टाकलेली आहे आणि खाली प्रत म्हणून विलास शिंदे यांचे नाव टाकताना त्यांच्यापुढे पद म्हणून मात्र गटनेता, शिवसेना-रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) महानगरपालिका आघाडी, नाशिक असा उल्लेख केला आहे. त्यामुळे एकप्रकारे विभागीय आयुक्तांनी महापालिकेत सेना-रिपाइंची आघाडी मान्यच केल्याचे म्हटले जात आहे.