शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

येवला पाणीप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 23:51 IST

येवला पाणीप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ठळक मुद्देयेवला शहराला पाणी पालखेड धरणातून पाणी द्यावे अशा आशयाचे निवेदन दिले.

येवला : शहरातील तलावातील पाणीसाठा पूर्णत: संपुष्टात आला असल्याने येवला शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, या मागणीसाठी येवला नगर परिषदेचे नगराध्यक्ष व नगरसेवकांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.यावेळी येवला पालिकेचे नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक प्रमोद सस्कर, रु पेश लोणारी, सचिन मोरे, रु पेश दराडे, अमजद शेख, शफीक शेख, संतोष परदेशी उपस्थित होते. प्रस्तुत मागणीबाबत जिल्हा प्रशासनावर चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेखेडकर यांनी यावेळी सांगितले. पालखेड धरणातून १ मार्चलापाणी आवर्तन देण्याचे मान्य करूनही पाणी सोडले नाही म्हणून थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून येवला शहराला पाणी पालखेड धरणातून पाणी द्यावे अशा आशयाचे निवेदन दिले.शहराला सध्याच्या परिस्थितीत १५ ते २० दिवसापासून पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत असून आता तर पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीच शिल्लक नसल्याने नागरिकांची हाल सुरु झाले आहे. काही भागात तर थेंबभर पाणी देखील मिळत नाही ही परिस्थिती आहे. पालखेड डाव्या कालव्याला आवर्तन सुटलेले नसून शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव कोरडेठाक झाले आहेत..नळांना पाणीच येत नसल्याने नागरिकांचे हाल सुरु असतांना नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ज्या भागात पाणी टंचाई गंभीर आहे तिथे टँकरने पाणीपुरवठा करावा असा आग्रह सर्वपक्षीय नगरसेवकानी प्रांताधिकारी यांचेकडे दोन दिवसापूर्वी धरला होता.